ढाणकी येथील जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळेत

34

🔹वर्ग 1ली ते 5वी च्या विद्यार्थिनींना गणवेश वाटप

✒️सिध्दार्थ दिवेकर(जिल्हा प्रतिनिधी,यवतमाळ)मो:-9823995466

उमरखेड(दि.18फेब्रुवारी):-तालुक्यातील ढाणकी येथील जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळेत दिनांक 17 /2/2022 रोज गुरुवारला समग्र शिक्षा अभियान अंतर्गत येणाऱ्या निधीतून शाळेतील वर्ग 1 ते 5 मधील सर्व विद्यार्थिनिंना, अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, बीपीएल धारक, विद्यार्थी यांना गणवेशाचे वाटप करण्यात आले.

यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष अनिल गायकवाड, प्रमुख पाहुणे म्हणून सभापती संबोधी गायकवाड, जॉन्टी विणकरे, अशोक मोरे, धम्मशिला नरवाडे, प्रियंका वैद्य, कुणाल भरणे, शेख अफरोज, तसेच शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य उपस्थित होते.

यावेळी सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मुख्याध्यापिका व्ही. के जवळेकर तर आभार प्रदर्शन शरद बचाटे सर यांनी केले, यावेळी श्री कुंभरवार सर, पालेपवाड मॅडम, प्रतापवार सर, राठोड सर, केंद्रे सर, शिनकरे ताई, इरलेवाड ताई,शेळके सर तथा पालक उपस्थित होते.