घे चुना, मळ पुन्हा..! तंबाखू नियंत्रण पथकाची गेवराईत धाड! किराणा दुकानात बीडी, सिगारेट, तंबाखू विकणाऱ्यांवर कारवाई

36

✒️नवनाथ आडे(जिल्हा प्रतिनिधी,बीड)मो:-9075913114

बीड(दि.18फेब्रुवारी):-तंबाखू नियंत्रण पथकाने गेवराईत धाड टाकली. यावेळी किराणा दुकानात बीडी, सिगारेट, तंबाखू विकणाऱ्यांवर कारवाई करण्यात आली.तंबाखू जन्य पदार्थ अर्थात बीडी, सिगारेट, तंबाखू आदी पदार्थ किराणा दुकाने पान टपरींमधुन सर्रास विक्री केली जात आहेत. विशेषकरून तंबाखु जन्य पदार्थ हे दुकानांमधून अठरा वर्षांच्या खालील मुलांकडून विक्री केले जात आहेत. किराणा दुकानातुन खाद्यपदार्थांसोबत तंबाखू जन्य पदार्थ विक्रीस बंदी आहे.

मात्र, गेवराई मध्ये किराणा दुकानांमधुन देखील मोठ्या प्रमाणावर तंबाखु जन्य पदार्थांची विक्री करण्यात येतेय. जिल्हा तंबाखू नियंत्रण अमंलबजावणी पथकाने गेवराईतील दुकानांची तपासणी केली यामध्ये दोन ते तीन दुकानांमध्ये तंबाखू जन्य पदार्थ विक्री होत असल्याचे निदर्शनास आसे.या दुकानांवर कारवाई करत त्यांना दंड देण्यात आला आहे. या पथकामध्ये जिल्हा तंबाखू नियंत्रण पथकातील अधिकारी, कर्मचाऱ्यांसह पोलीस व आदी उपस्थित होते.