जरूड जिल्हा परिषद सर्कलमध्ये ३ कोटी २६ लक्ष रुपयांच्या विकासकामांचे भूमिपूजन !

30

🔸भक्कम पायाभूत सुविधांमुळे विकासाला गती मिळेल — आमदार देवेंद्र भुयार

✒️वरुड(पुरोगामी न्युज नेटवर्क)

मोर्शी(दि.22फेब्रुवारी):- विधानसभा मतदार संघामध्ये उत्तम रस्ते, पूल, इमारती आदी पायाभूत सुविधांची अनेक कामे आमदार देवेंद्र भुयार यांनी हाती घेतली आहेत. पायाभूत सुविधांची दर्जेदार निर्मिती करण्यास प्राधान्य दिले जात असून, त्यामुळे दळणवळण वाढून विकासाला गती मिळणार आहे.असे प्रतिपादन मोर्शी विधानसभा मतदार संघाचे आमदार देवेंद्र भुयार यांनी आज केले.ग्रामीण भागात विविध सुविधा उपलब्ध व्हाव्यात यासाठी अनेक विकास कामांना गती देण्यात आली आहे. प्रशासकीय यंत्रणेने ही कामे गतीने पूर्ण करावी, असे निर्देश आमदार देवेंद्र भुयार यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले.

जरूड जिल्हा परिषद सर्कलमधील अमडापूर, राजुरा बाजार, वाडेगाव, काटी, वाघाळ, गडेगाव येथील विकासकामे करण्याकरिता ३ कोटी २६ लक्ष रुपये मंजूर करून काटी ते गाडेगाव सुधारणा करणे करिता 15 लक्ष रुपये, वाडेगाव येथे 2515 निधी योजणे अंतर्गत सामाजिक भवन बांधकाम करणे करिता 7 लक्ष रुपये, जि.प.शाळा वाडेगाव येथे शाळेची दुरुस्ती, सौंदर्यीकरण व वॉलकंपाउंड दुरुस्ती करणे, राजुराबाजार येथील स्मशान भूमितील वॉल कंपाउंड आणि बेंच बसविणे करिता 2 लक्ष 50 हजार रुपये, राजुराबाजार येथे 2515 योजणे अंतर्गत काँक्रिट रस्ता बांधकाम करणे करिता 9 लक्ष 99 हजार 736 रुपये, गजानन महाराज देवस्थान येथील सभागृहाचे बांधकाम करणे व परिसरात पेविंग ब्लॉक बसविणे करिता 10 लक्ष 50 हजार रुपये, जि. प. प्राथमिक शाळा राजुरा बाजार येथे शाळा दुरुस्ती, शौचालय बांधकाम व हायमास्क लाईट बसविणे, प्राथमिक आरोग्य केंद्र राजुराबाजार येथील कर्मचारी निवासस्थान करिता 8 लक्ष रुपये, अमडापूर येथे 2515 निधी योजणे अंतर्गत ग्राम सिमेंट रस्ता बांधकाम करणे करिता 4 लक्ष 82 हजार 521 रुपये, अमडापूर येथे अंगणवाडी बांधकाम करण्याकरिता 8 लक्ष 50 हजार रुपये, अमडापूर येथील स्मशान भूमि पोच रस्ता व स्लॅप ड्रेन बांधकाम करणे करिता 3 लक्ष रुपये, अमडापूर, राजुरा बाजार, वाडेगाव, काटी, वाघाळ, गडेगाव येथील या सर्व विकसकामांकरिता ३ कोटी २६ लक्ष रुपये निधी मंजूर करून आमदार देवेंद्र भुयार यांच्याहस्ते विविध विकास कामांचा भूमिपूजन सोहळा संपन्न झाला.

यावेळी भूमिपूजन समारंभाला आमदार देवेंद्र भुयार, जि.प. सदस्य राजु भाऊ बहुरूपी, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुका अध्यक्ष बाळू कोहळे पाटील, माजी सभापती राजाभाऊ कुकडे,सुभाष शेळके,रामचंद्र राऊत, ज्ञानेश्वर यावले, अमडापूर येथील सरपंच वैशालीताई गवई, उपसरपंच नितीन खापरे, राजुरा बाजार येथील सरपंच निलेश धुर्वे, उपसरपंच किशोर गोमकाळे, वाडेगाव, सरपंच सुधाकरराव दोड, उपसरपंच चिंतामनराव नागदेवे, काटी येथील सरपंच कुसुमताई नागले, उपसरपंच अश्विनीताई पाचपोर, सौ.सुचिताबाई साबळे, सौ.सारिकाताई सोनारे,प्रतापभाऊ खापरे, प्रदीप सोनारे, सुधाकरराव गुडधे, बबलू श्रीराव, दिलीपराव भोंडे, किशोर गोमकाळे, सुधाकर डाफे, भानुदास भोंडे, रामचंद्र राऊत, सचिन सावरकर, रोशन माटे, बाळु सुरेशराव टेकोडे, नारायण मस्की, भागवत शहाणे, प्रल्हादराव हरले, बंडुपंत कुटे, सुनिल नागले, प्रमोद बहुरूपी यांच्यासह राजुरा बाजार, आमडापूर, वाडेगाव, काटी येथील ग्राम पंचायत सदस्य व नागरिक उपस्थित होते.