झाडीबोली साहित्य संमेलनाचे बोधचिन्ह प्रकाशित

35

✒️रोशन मदनकर(उप संपादक)

चंद्रपूर(दि.22फेब्रुवारी):-जुनासुर्ला ता. मुल येथे होणाऱ्या २९ व्या झाडीबोली साहित्य संमेलनाचे अधिकृत बोधचिन्ह प्रकाशित झालेले आहे. मंडळाच्या परंपरेप्रमाणे दरवर्षी होणाऱ्या झाडीबोली साहित्य संमेलनाच्या निमित्ताने झाडीपट्टीतील ग्राफिक्सकारांकडून बोधचिन्ह बाबत प्रवेशिका बोलाविल्या जातात, त्यातून उत्कृष्ट असलेल्या बोधचिन्हाची निवड संमेलनासाठी केली जाते. सदर बोधचिन्ह संमेलनाचे प्रवेशद्वार, सभागृहात लावले जाते.

यावर्षीच्या बोधचिन्हांमध्ये मुल- गडीसुरला भागातील निसर्गसौंदर्य ,लोककला , ऐतिहासिक मंदिर आणि कृषी जीवन यावर प्रामुख्याने प्रकाश टाकलेला आहे . सुप्रसिद्ध ग्राफिक्सकार रामकृष्ण चनकापुरे यांचे सदर बोधचिन्ह निवडल्या गेल्याबद्दल त्यांचे अभिनंदन स्वागताध्यक्ष रंजीत समर्थ, कार्याध्यक्ष गणेश खोबरागडे, उपसरपंच खुशाल टेकाम , ग्रामगीताचार्य बंडोपंत बोढेकर, झाडी बोली साहित्य मंडळांचे जिल्हा प्रमुख कवी अरूण झगडकर, जुनासुर्ला शाखेचे अध्यक्ष लक्ष्मण खोब्रागडे,प्रशांत भंडारे,सुनील पोटे,संतोषकुमार उईके,अनिल आंबटकर,संगिता बांबोळे,वृंदा पगडपल्लीवार,उपेंद्र रोहणकर,नंदकिशोर मसराम,प्रा.विनायक धानोरकर,संतोष मेश्राम आदींनी अभिनंदन केले आहे. या संमेलनाची जय्यत तयारी सुरू असून विविध समित्यांचे गठन करण्यात आलेले आहे . येत्या १२ आणि १३ मार्च रोजी होत असलेल्या या संमेलनात चारही जिल्ह्यातील बोली अभ्यासक, साहित्यिक सहभागी होत आहे