गेवराई तालुक्यातील सतरा तलावांच्या दुरुस्तीसाठी ३० कोटी ७२ लक्ष रुपयांचा निधी मंजूर

30

🔸विजयसिंह पंडित यांच्या पाठपुराव्याला यश

✒️नवनाथ आडे(जिल्हा प्रतिनिधी बीड)मो:-9075913114

गेवराई(दि.२४फेब्रुवारी):- तालुक्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या पाझर तलाव आणि बंधाऱ्यांच्या दुरुस्तीसाठी निधी मंजूर करावा यासाठी माजी आ. आमरसिंह पंडित यांच्या मार्गदर्शनाखाली विजायसिंह पंडित यांनी केलेल्या पाठपुराव्याला यश आले असून तालुक्यातील १५ पाझर तलाव आणि ०२ कोल्हापुरी बंधाऱ्याच्या दुरुस्तीसाठी ३० कोटी ७२ लक्ष रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. विजायसिंह पंडित यांनी महाविकास आघाडी सरकारचे आभार मानले.

गेवराई तालुक्यात झालेल्या अतिवृष्टी आणि गारपिटीमुळे शेती, पीके आणि शेतजमिनीसह तलावांचे प्रचंड नुकसान झाले होते. शेतकऱ्यांच्या जमिनी खरडून जाऊन पिकांचेही नुकसान झाले होते. अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या पाझर तलाव आणि कोल्हापुरी पद्धतीच्या बंधाऱ्यांची दुरुस्ती व्हावी यासाठी माजी आमदार अमरसिंह पंडित यांच्या मार्गदर्शनाखाली बीड जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष विजयसिंह पंडित यांनी सातत्याने शासनदरबारी पाठपुरावा केला. बीड जिल्ह्याचे पालक मंत्री ना. धनंजय मुंडे यांनी बाधित तलावांची पाहणी केली होती. त्यांच्या शिफारशीसह जलसंधारण मंत्री ना.शंकराव गडाख वित्त व नियोजन मंत्री ना. अजितदादा पवार यांच्यासह इतरांकडे सातत्याने पाठपुरावा करून गेवराई तालुक्यातील अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या पाझर तलाव, गावतलाव आणि बंधाऱ्यांच्या दुरुस्तीसाठी निधी उपलब्ध करण्यासाठी सातत्याने विजयसिंह पंडित यांनी पाठपुरावा केला.

विजयसिंह पंडित यांच्या पाठपुराव्यामुळे जलसंधारण विभागाने गेवराई तालुक्यातील बाधित झालेल्या झालेल्या पाझर तलाव आणि बंधाऱ्यांच्या दुरुस्तीसाठी ३० कोटी ७२ लक्ष रुपयांचा निधी उपलब्ध झाला आहे. यामुळे तालुक्यातील ५१५ हेक्टर सिंचन क्षेत्रामध्ये वाढ होणार आहे. या कामात जलसंधारण विभागाने शासन निर्णयाद्वारे प्रशासकीय मान्यता बहाल केली असून लवकरच कामाच्या निविदा प्रक्रिया सुरू करण्याचे आदेश दिलेले आहेत. विजयसिंह पंडित यांच्या माध्यमातून झालेल्या या कामामुळे गेवराई तालुक्यातील सिंचन क्षेत्र वाढणार असून लवकरच या कामाला सुरुवात होणार असल्यामुळे या भागातील शेतकऱ्यांनी विजयसिंह पंडित यांचे आभार व्यक्त केले आहेत.