ग्राहकांनी चुकीच्या अफवावार लक्ष देऊ नये, वीज बिल भरून सहकार्य करावे;महावितरण

16

🔹नागपूर(पुरोगामी संदेश नेटवर्क)

नागपूर(दि.24 जून.)महावितरणने ग्राहकांचे अचूक वीज बिल देण्यासाठी पूर्ण खबरदारी घेतली आहे तसेच हे करत असताना ग्राहक हितही लक्षात ठेवले आहे त्यामुळे चुकीच्या अफवाववर लक्ष न देता ग्राहकांनी वीज बिल भरून महावितरणला सहकार्य करावे,असे आवाहन महावितरणने केले आहे.
MSEB की मनमानी, MSEB की लूट असा हिंदीमधील संदेश सध्या सोशल मीडियावर फिरत आहे.परंतु हा संदेश पुर्णतः चुकीचा व आकडेवारीचा बनाव करून ग्राहकांच्या मनात गैरसमज पसवरणारा आहे.
या संदेशा मध्ये तीन महिन्याच्या ६६४ युनिटला ११.७१ रुपये वीज दर आकारला गेला ज्यामुळे ७ हजार ७७५ रुपये वीज आकार लावण्यात आला असे सांगितले आहे.यात MSEB ने बिल के 3 भाग करके बिल देना था जैसे 230 x 7.50 = 1725/- होता है 1725/- x 3 महीने = 5175/- होता हैं, लेकिन यह भेजा 8400-ये है MSEB की मनमानी असे म्हटले आहे.
परंतु वास्तवात यापेक्षाही कमी आकारणी महावितरण कडून केली जाते.ती या प्रमाणे असते
जर बिलाला ३ ने भागीले तर (६१२/३=२०३) युनिट प्रतिमहिना होतात.२०३ युनिट एका महिन्याला गृहीत धरून पहिल्या १०० युनिटला ३.४६ रुपये= ३४६ रुपये १११३.उर्वरित १०३ युनिटला ७.४५ रुपये = ७ हजार ६७.३५ रुपये
दोघांची बेरीज ३४६+७६७.३५= १ हजार ११३.३५
तीन महिन्याचे (१११३.३५*३=३३४०.०५ रुपये)
याप्रमाणे आकारणी होते.त्यामुळे त्या खोट्या संदेशात सांगितल्या प्रमाणे ती ७ हजार ७७५/- किंवा ५ हजार १७५/- होत नसून केवळ ३ हजार ३४०.०५ रुपये एवढीच होते.
वीज दर हा बिलात मागच्या बाजूला जिथे बिलाचे कॅल्क्युलेशन दिलेले असते तिथे स्थिर आकाराच्या खाली असतो.बिलावरील रक्कम आणि या अफवेमध्ये सांगितल्या प्रमाणे आपल्या बिलाची रक्कम जुळते का हे ग्राहकांनी बघावे.ती जुळणार नाही.बिलावरील रक्कम या कॅलक्युलेक्शनपेक्षा कितीतरी कमी येईल.कारण अफवेमध्ये सांगितलेले कॅलक्युलेक्शनच मुळात चुकीचे आहे. केवळ मोठी रक्कम टाकून आपली दिशाभूल करावी हाच उद्देश संदेश तयार करणाऱ्यांचा आहे.
ग्राहकांनी मागील वर्षीच्या उन्हाळ्याचा वापर आणि चालू वर्षातील लॉकडॉऊनमध्ये २४ तास घरात राहून केलेला वीज वापर यांची तुलना केली तर यावर्षीचा वापर हा मागच्या वर्षीच्या वापराच्या तुलनेत बरोबर आहे असे लक्षात येइल.तसेच
महावितरण ही खासगी नसून सरकारी कंपनी आहे ती वीज बिलात कुठलीही आकारणी छुप्प्या स्वरूपात करत नाही.विद्युत नियामक आयोगाने ठरवून दिलेल्या दरानुसारच बिल आकारते.

त्यामुळे सोशल मीडियावर फिरणारा संदेश हा केवळ जनतेची दिशाभूल करून जनतेमध्ये रोष पसरविण्यासाठी तयार केलेला आहे.
कोरोना अजूनही संपलेला नाही. त्यामुळे वीज ग्राहकांनी घरी बसूनच सोबत दिलेल्या लिंकवर जाऊन आपले बिल तपासून घ्यावे.
https://billcal.mahadiscom.in/consumerbill/
ग्राहकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये आणि वीज बिल भरून महावितरणला सहकार्य करावे असे कळकळीचे आवाहन महावितरणने केले आहे.