राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त विठ्ठलवाडा येथे शाळास्तरावर विज्ञान प्रदर्शनी

32

✒️रोशन मदनकर(उप संपादक)

चंद्रपूर(दि.1मार्च):-जि प उ प्राथमिक शाळा विठ्ठलवाडा येथे राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त विज्ञान शिक्षक विठ्ठल गोंडे यांनी शाळास्तरावर विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन केले.या मध्ये इयत्ता 6वी,7 वी चे जवळपास 20 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.या मध्ये उत्कृष्ट विज्ञान प्रयोग सादर करणाऱ्या विद्यार्थ्यांना क्रमांक देण्यात आले. प्रथम क्रमांक अथर्व प्रमोद दुर्गे द्वितीय क्रमांक माही अविनाश दुर्गे तिसरा क्रमाक रागिणी जगदीश गायकवाड यांना देण्यात आले.प्रदर्शनीचे मुल्यमापन उराडे सर,उमरे सर यांनी केले. तसेच या विज्ञान दिनानिमित्त निबंध स्पर्धा, रांगोळी स्पर्धा पण घेण्यात आल्या.

कार्यक्रमाचे अध्यक्ष आवळे सर होते.यावेळी डॉ सि व्ही रामन यांच्या जीवन कार्यावर प्रकाश टाकण्यात आला.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन समीक्षा विद्ये हिने केले तर आभार प्रदर्शन माही दुर्गे हिने केले. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी गेडाम सर, मोरे सर, कोकुलवार सर,गीतांजली चौधरी मॅडम यांनी सहकार्य केले.
अशा प्रकारे जि प उ प्राथमिक शाळा विठ्ठलवाडा येथे राष्ट्रीय विज्ञान दिन साजरा करण्यात आला.