राज्यस्तरीय पुरस्कार प्राप्त शिवानंद पांचाळ यांचा नायगांवात सत्कार

42

✒️नायगांव(पुरोगामी न्युज नेटवर्क)

नायगाव बाजार(दि.१मार्च):- भारत सरकार नोंदणीकृत माणुसकी सोशल फाउंडेशन संचलित ग्राहक उपभोक्ता संरक्षण समिती मार्फत राज्यस्तरीय माणुसकी सेवा गौरव पुरस्कार २०२२ नाशिक येथील हॉटेल ग्रँड आश्विन येथे नाशिकच्या आमदार मा.सीमाताई हिरे , तसेच माणुसकी सोशल फाउंडेशन संचलित ग्राहक उपभोक्ता संरक्षण समितीचे राष्ट्रीय संस्थापक अध्यक्ष मा.दादाभाऊ केदारे सह आदी मान्यवरांच्या हस्ते शिवानंद पांचाळ नायगांवकर यांना राज्यस्तरीय माणुसकी सेवा गौरव पुरस्काराने गौरविण्यात आले.

सदर पुरस्कार पांचाळ यांना प्राप्त झाल्याबद्दल त्यांचा नायगांवात सुप्रसिद्ध डॉ गजानन पाटील गडगेकर साहेब गोसाई युवा शक्ती जिल्हाध्यक्ष- दत्तात्रय बन होटाळकर, परीट समाज संघटनेचे जिल्हाध्यक्ष तथा पञकार शिवाजी कुंटूरकर , पञकार दिपक गजभारे, परीट समाज संघटनेचे जिल्हाध्यक्ष पञकार बाळू ईकळीकर धुंगराळकर यांच्या वतीने शाल श्रीफळ पुष्पहार घालून सत्कार करण्यात आला यावेळी भगवान पाटील कानोले सह आदींची उपस्थिती होती, शहरातून विविध क्षेत्रातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे,