आयशर आणि पिकप चा अपघात दिंडोरी तालुक्यातील चाचडगाव येथील तीन ठार दोन जखमी

33

✒️विजय केदारे(विशेष प्रतिनिधी)

नाशिक(दि.1मार्च):– गुजरात राज्याला जोडणाऱ्या नाशिक पेठ महामार्गावर नाशिक कडून गुजरात राज्य कडून येणारी आयशर व चाचडगाव कडून जाणारी पिकप यांच्यात समोरासमोर धडक झाल्याने चाचडगाव येथील तीन जण ठार दोन जण गंभीर जखमींना 108 रुग्णवाहिकेने नाशिक ग्रामीण रुग्णालयात दाखल केले आहे.

मिळालेली माहिती अशी की चाचडगाव कडून येणारी पिकप क्रमांक एम एच 15 ये जी 937 गुजरात कडून येणारी आयशर ट्रक क्रमांक एम एच 15 पी व्ही 89 34 यांची समोरासमोर धडक झाली.या भीषण अपघातात दिंडोरी तालुक्यातील चाचडगाव येथील संतोष हिरामण लांडे वय 25, हेमंत रघुनाथ मोरे वय 26, कमलेश सुखदेव मोरे वय 27, जागीच ठार झाले. तर लखन भगवान गांगोडे वय 25, रवींद्र वामन पोटींदे वय 27, यांना नाशिक जिल्हा ग्रामीण रुग्णालय येथे दाखल केले आहे.

या घटनेची माहिती दिंडोरी उमराळे बुद्रुक पी आय वाघ ,पोलीस उपनिरीक्षक कावळे, धनंजय शीलवटे चाचडगाव, पोलीस पाटील पुरुषोत्तम पंडित यांना कळताच घटनास्थळी दाखल होऊन जखमींना रुग्णालयात पाठवण्यात आले.

यावेळी चाचड गाव येथील ग्रामस्थांनी मदत कार्य केले. नाशिक पेठ महामार्गावर अपघात जबरदस्त होता की पिकप गाडीचा चक्काचूर झाला रस्त्यावर रक्ताच्या थारोळे पडले होते. यामुळे चाचडगाव गावावर शोककळा पसरली असून पुढील तपास दिंडोरी पी आय व कावळे यांच्या मार्गदर्शनाखाली शीलवटे करीत आहे