गंगाखेड व्यापारी महासंघाचा डोंगरी जन परिषदेच्या “बेमुदत साखळी आंदोलनास” जाहीर पाठिंबा

30

✒️अनिल साळवे(गंगाखेड प्रतिनिधी)

गंगाखेड(दि.1मार्च):- येथे तहसील कार्यालय समोर
डोंगरी जन परिषदेचे मुख्य संयोजक श्री पंडितराव घरजाळे व त्यांचे सहकारी गेल्या सात दिवसापासून शेतकरी बांधवांच्या विविध मागण्यासाठी गंगाखेड तहसील कार्यालयासमोर निदर्शने करत आहेत.आज आंदोलनाच्या आठव्या दिवशी गंगाखेड तालुक्यातील सर्व व्यापारी संघटना कडून शेतकरी जो जगाचा पोशिंदा आहे त्याच्यावर झालेल्या अन्यानायासाठी जो लढा डोंगरी जन परिषदेतर्फे उभा केला त्याला जाहीरपणे साथ देण्याची हमी दिली व तसेच जर या मागण्या लवकरात लवकर मान्य नाही करण्यात आल्या तर गंगाखेड व्यापारी महासंघातर्फे संपूर्ण गंगाखेड बाजारपेठ बंद. ठेवण्याचे आश्वासन ही देन्यात आले. त्याअनुषंगाने गंगाखेड व्यापारी महासंघातर्फे शुक्रवारी दिनांक ०४/०३/२०२२ रोजी *”गंगाखेड बाजारपेठ बंद”* करण्याचे आवाहन करण्यात येत आहे.

यावेळी डोंगरी जन परिषदेच्या आंदोलनस्थळी गंगाखेड व्यापारी महासंघाचे अध्यक्ष श्री.दगडू सोमाणी, मा. नगराध्यक्ष रामप्रभू मुंडे, श्रीनिवास मुंडे,दीपक मुरकुटे आदी उपसथित प्रतिनिधींनी डोंगरी जन परिषदेचे मुख्य संयोजक श्री पंडितराव घरजाळे, जगनाथ मुंडे,आश्रोबा दत्तराव सोडगीर केशव भेंडेकर जगन्नाथ मुंडे बालासाहेब प्रभाकर सोडगीर , बालाजी मुंडे,माधव मुंडे ,मनोहर खांडेकर चंद्रकांत खांडेकर शंकर तरडे आदी शेतकरी बांधवांची आंदोलनस्थळी भेट घेतली व त्यांना जाहीर पाठिंबा देणारे पत्र सुपूर्द केले.