घुग्घुस शहरातील हातपंप (बोअरींग) दुरुस्ती करण्याची आम आदमी पार्टीची मागणी

34

✒️पंकज रामटेके(घुग्घुस प्रतिनिधी)

घूग्घुस(दि.2मार्च):- शहरामध्ये गेल्या कित्तेक महिन्यांपासून हातपंप (बोअरिंग) बंद पडलेल्या आहेत ज्यामध्ये वार्ड क्रमांक दोन (२)सुरेश कोत्तलवार, शिवनगर येथील अरबी यांच्या घरासमोरील, वार्ड क्रमांक सहा (६)येथील कमलेश जिम समोरील अश्या वेगवेगळ्या ठिकाणच्या हातपंप बंद आहे ज्यामुळे शहरामध्ये सर्वत्र पाण्याची समस्या दिसून येत आहे सोबतच उन्हाळा येत असल्यामुळे पाण्याची टंचाई भासणार याची दखल घेत आम आदमी पार्टी द्वारा नगरपरिषद घूग्घुस ला निवेदन देण्यात आले व तत्काळ हातपंप (बोअरींग) दुरुस्त करण्यात यावी अशी मागणी यावेळी करण्यात आली ज्यामुळे येत्या उन्हाळ्यामध्ये घूग्घुस शहरातील नागरिकांना पाण्याकरिता भटकंती करावी लागणार नाही.

यावेळी आम आदमी पार्टी, घुग्घुस महिला सदस्य उमा टोक्कलवार, पूनम वर्मा,विपश्यना अनुप धनविजय,सोनम शेख,अंजली नगराळे,रूबिया शेख,विजया उपलेट्टी,शिला उपलेट्टी,हसीना शेख,कविता विष्णु भक्त,देविणा नाईकाप,नईमा शेख,धम्मदिणा नायडू सोबत,शहर अध्यक्ष अमित बोरकर, उपाध्यक्ष अभिषेक सपडी, सचिव संदीप पथाडे, विकास खाडे, आशिष पाझारे, प्रशांत पाझारे, प्रशांत सेनानी, रवी शंतलावार, अभिषेक तलापेल्ली, अनुप नळे, स्वप्नील आवळे,सागर बिऱ्हाडे, इत्यादी कार्यकर्ते उपस्थित होते…