आईच्या दुधाचा बाजार

79

आईचे दूध हाच बाळाचा सर्वात उत्तम आहार आहे. आईचे दूध निर्जंतुक असते. आईच्या दुधात प्रथिने स्निग्ध पदार्थ तसेच जीवनसत्त्वे, क्षार आणि रोगप्रतिबंधक घटक असतात म्हणूनच आईच्या दुधाची तुलना इतर कुठल्याही दुधाशी होणार नाही. आईचे दूध पचायला हलके असते. बाळाच्या वाढीस जरूर असणारे सर्व पोषक घटक योग्य त्या प्रमाणात असतात. आईच्या दुधाचे तापमान बाळास योग्य असते. मुख्य फायदा म्हणजे स्तनपानामुळे आई व मुलात शारीरिक आणि भावनिक नाते निर्माण होते. त्यामुळे परस्परातील प्रेम वात्सल्य वाढते. मात्र आज अनेक कंपन्या आईच्या दुधापेक्षा डबाबन्ध दूध कसे योग्य व बाळाच्या असरोग्यास कसे चांगले आहे,है पालकांच्या मनावर बिंबवत आईच्या दुधाचा बाजार करत कोटयावधी रुपयांचा खर्च जाहिरातिवर करत बाळाला आईच्या दुधापासून वंचित ठेवत आहे..या पार्श्वभूमीवर आईच्या दुधाचा काळा बाजार रोखण्याची व शिशूंच्या घटनात्मक अधिकाराचे रक्षण करण्याची गरज आहे.

जागतिक आरोग्य संघटना आणि युनिसेफ यांनी ८देशांमध्ये केलेल्या सर्वेक्षणानंतर ही बाब समोर आली आहे. डबाबंद दूध बाळाच्या आरोग्यासाठी कसे योग्य आहे ,हे सांगण्यासाठी संबंधित कंपन्या आईवडिलांची दिशाभूल करत आहे. यासाठी कोट्यवधी रुपये देत कंपन्या संशोधन पेपर तयार करत आहे.यासाठी ऑन लाईन व ऑफ लाईनची देखील मदत घेतली जात आहे.त्याचसोबत डबाबंद दुधाची जाहिरात करण्यासाठी मोफत पाकीटे देखील वाटली जात आहे.या कामी वैद्यकीय क्षेत्रातील डक्टर्स व हेल्थ केअर यांना यासाठी तयार करण्यात आले आहेत जेणेकरून ते आईवडिलांना डबाबंद दूध बाळाला देण्याचा सल्ला देतील.

जगभरात डबाबंद दुधाची बाजारपेठ ५५हजार डॉलर पेक्षा जास्त असून,पालक याला बळी पडत आहे.जागतिक आरोग्य संघटना व युनिसेफ अनेक देशांच्या सरकारांना डबाबंद दूध रोखण्याचे आवाहन करत आहे,मात्र कंपन्यांनी केलेल्या जाहिरातीमुळे पालक आईऐवजी डबाबंद दूध बाळाला देत आहे.

कर्नाटक उच्च न्यायालयाने जन्म देणारी आई (जेनेटिक मदर) आणि पालनपोषण करणारी आई (फॉस्टर मदर) यांच्या एका खटल्यावर सुनावणी करताना स्तनपान हा घटनात्मक अधिकार आहे, असे म्हटले आहे. स्तनपानाचे असंख्य फायदे असून जन्मजात बाळासाठी त्याहून दुसरे पोषक आणि सुरक्षित असे काहीही नसते. असे असताना जगातील अनेक कंपन्या केवळ फायदा कमावण्यासाठी बेबी मिल्कची विक्री आणि प्रमोशन करत आहेत.

स्तनपान हा घटनात्मक अधिकार आहे,. घटनेच्या कलम २१ मध्ये आईला हा अधिकार दिल्याचे म्हटले आहे. त्यापासून तिला दूर करता येणार नाही. तसेच नवजात बालकाचाही आईच्या दुधावर पूर्ण हक्क आहे. या दोन्ही गोष्टी एकमेकांशी जोडलेल्या आहेत. घटनेबरोबरच आंतरराष्ट्रीय कायद्यातही त्याची तरतूद आहे. मानवाधिकाराच्या जागतिक जाहीरनाम्यात १९८९ च्या बालहक्काच्या आंतरराष्ट्रीय कन्वेन्शनच्या कलम २५ (२) नुसार नवजात बालकाला आईच्या दुधाचा हक्क प्रदान केला आहे. आईला देखील आपल्या मुलाला दूध देण्याचा हक्क दिला आहे.तेव्हा पालकांनी डबाबंद दुधाला बळी न पडता आपल्या बाळाला आईच्या दुधापासून वंचित ठेवू नये,आईच्या दुधावर बाळाचा घटनात्मक अधिकार आहे.

कृत्रिम दूध किंवा जनावरांचे दूध, नवजात फॉर्म्युला, पावडरचे दूध, चहा, गोड पदार्थ, पाणी आणि ब्रेकफास्टमध्ये दिलेले खाद्य हे आईच्या दुधाच्या तुलनेने कमी पौष्टिक असतात. आईचे दूध बाळाला सहजपणे पचते. नवजात शिशूंच्या सर्व गरजा आईच्या दुधातून पूर्ण होतात. पाणी आणि अन्य पेय हे सुरुवातीच्या सहा महिन्यांच्या काळात बाळासाठी आवश्यक नाहीत. शिशूला आईच्या दुधाऐवजी अन्य खाद्यपदार्थ दिले तर अनेक आजारांची लागण होण्याची भीती राहते.

स्तनपान हे बाळाचा आणि लहान मुलांचा गंभीर आजारापासूनही बचाव करते. त्याअनुषंगाने आईचे दूध हे मुलांचे पहिले लसीकरण मानले जाते. कारण ते सर्व प्रकारच्या संसर्गापासून बाळाला सुरक्षित करते. या दुधाने मुलांची रोगप्रतिकारक शक्ती वाढते. सर्वसाधारणपणे स्तनपान करणारी मुले ही बाटलीचे दूध पिणा-या बाळांपेक्षा अधिक कुशाग्र असतात.

✒️लेखक:-प्रा डॉ सुधीर अग्रवाल(मो:-९५६१५९४३०६)