चिंतामणी राञ प्रशालेत इ.१० वी इ.१२ वी विद्यार्थ्यांवर्गाचा शुभेच्छा समारंभ संपन्न

35

✒️पुणे(पुरोगामी न्युज नेटवर्क)

पुणे(दि.2मार्च):-चिंचवड-चिंतामणी राञ प्रशाला व कनिष्ठ महाविद्यालय,चिंचवड स्टेशन,पुणे -१९ मध्ये शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थी वर्गाचा नुकताच निरोप समारंभ अर्थात परीक्षेसाठी शुभेच्छा समारंभ संपन्न झाला.इ.१० वी व इ.१२ वी च्या विद्यार्थ्यांना विद्यालयावतीने परीक्षेसाठी शुभेच्छा देण्यात आल्या.वर्षभर परीक्षेची तयार करुन घेण्यात आली.नवीन बोर्ड पॅर्टनचा अभ्यासक्रम व बोर्ड पेपर सोडविण्यासाठी शिक्षकांकडून मार्गदर्शन करण्यात आलेले आहे.

यावेळी सरस्वतीपूजन करुन कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी काॅलेजचे प्राचार्य दिलीप लंके उपस्थित होते.यावेळी ते म्हणाले की,”घराट्यातुन उडून जाण्यासाठी पक्षी त्या लहान पिल्लांचे पालन पोषण करतात.त्यांच्या पंखात बळ येत पर्यंत त्यांना सर्व शिकवत असतात.पिल्ले आता स्वत:पंखात बळ आणून आता उडू शकतात.हि खाञी झाल्यावर त्यांना स्वत:च्या पंखाने आत्मविश्वासाने उडण्यासाठी आकाशात सोडून देतात.त्या प्रमाणे दहावी व बारावी च्या वर्गाच्या विद्यार्थी वर्गास परीक्षेला सामोरे जाण्यासाठी वर्षभर शिक्षक आत्मविश्वास निर्माण करतात.हा आत्मविश्वास बळकट करण्यासाठी शुभेच्छा समारंभाच्या माध्यमातुन त्यांच्या मनातील परीक्षेबद्दलची भिती दूर होऊन ते परीक्षेत सहज उत्तीर्ण होतात.”

यावेळी प्रमुख पाहुणे प्रा.शरद वंझारी उपस्थित होते.तसेच यावेळी मारुती वाघमारे,प्रा.राजेंद्र सोनवणे,प्रा.प्रिया भामरे,प्रा.रुखसाना शेख,प्रा.अनिल चौधरी,केशव कळसकर इ.शिक्षकवृंद ही उपस्थित होते.

यावेळी विद्यार्थी व विद्यार्थींनी आपले मनोगत व्यक्त करुन शिक्षक व विद्यालयाबद्दल आदरभाव व्यक्त केला.शिक्षकांनी यावेळी परीक्षेसाठी विद्यार्थी वर्गास शुभेच्छा दिल्या.शिक्षकांचा सत्कार विद्यार्थी वर्गाने शाल,गुलाबपुष्प देऊन करण्यात आला.चिंतामणी राञ प्रशाला व कनिष्ठ महाविद्यालय हे गेली ४० वर्षांपासुन पिंपरी चिंचवड शहरात ज्ञानदानाचे काम करत आहे.शिक्षणासाठी वयाची अट नसल्याने अनेकांना अपुर्ण राहीलेले शिक्षण पुर्ण करण्याची संधी मिळत आहे.इ.८ वी ते इ.१२ वी पर्यंत दिवसभर काम करुन राञी ६ ते १० या वेळेत आपले शिक्षण पुर्ण करण्याची संधी येथे मिळत आहे.हजारो विद्यार्थी वर्गाच्या जीवनात ज्ञानाचा प्रकाश देण्याचे काम विद्यालय करत आहे.कमी वेळेत सर्व अभ्यासक्रम पूर्ण करुन विद्यार्थी वर्गाची सर्व बाजुने शैक्षणिक तयारी करुन घेण्याचे काम येथिल उच्चशिक्षित शिक्षक तळमळीने करत आहे.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा.रुकसाना शेख यांनी केले.कार्यक्रमाचे सुञसंचालन प्रा.राजेंद्र सोनवणे यांनी केले.आभार प्रा.प्रिया भामरे यांनी मानले.