यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान मुबंई व सूरज दादा फाउडेन शिरूर अनंतपाळ च्या वतीने भव्य मोफत आरोग्य शिबीर संपन्न

33

✒️नायगाव,तालुका विषेश प्रतिनिधी(हानमंत चंदनकर)

नायगाव(दि.2मार्च):-शिरूर अनंतपाळ शहरात मोरया लॉन्स येथे यशवंतराव प्रतिष्ठान मुबंई व सूरज दादा चव्हाण प्रतिष्ठान शिरूर अनंतपाळ च्या संयुक्त विध्यमाणे अस्थिव्यंग ,कर्णबधिर ,डोळ्यांचे तब्बल 700 रुग्णांची तपासणी व उपचार मोफत करण्यात आले आहे या शिबिराच्या उदघाटन प्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा प्रदेश कार्यध्यक्ष सूरज दादा चव्हाण ,तहसीलदार अतुल जटाळे ,गटविकास अधिकारी बी,टी, चव्हाण ,पोलीस निरीक्षक अशोक बेले ,जिल्हा शल्यचिकित्सक देशमुख ,डॉ,बालाजी देवग्रे ,डॉ,नसीम पठाण यांच्या प्रमुख उपस्थिती मध्ये या शिबिराचे उदघाटन करण्यात आले ,या प्रसंगी जिल्हा शल्य चिकित्सक देशमुख म्हणाले की ग्रामीण असे शिबीर खूप कमी लोक घेताना दिसतात ही उणीव भरून काढण्यासाठी गोरगरिबांना याचा जास्तीत जास्त रुग्णांना या शिबिराचा फायदा व्हावा असा उदात्त हेतू समोर ठेऊन अस्थिव्यंग रुग्णांना कृतिरिम अवयव तयार करण्यासाठी मोजमाप घेणे जे कर्णबधिर आहेत.

त्यांना मशीन द्वारे चेक करून त्यांना श्रवण यंत्र वाटप करणे डोळ्यांच्या रुग्णांची तपासणी करून त्यांना चष्मे वाटप करणे मोती बिंदू चे शस्त्रक्रिया करणे ह्या बाबी सर्व सामान्य कुटूंबाला परवडण्यासारखे नाही यामुळेच ही बाब चव्हाण यांच्या लक्षात आल्याने या शिबीराचे आयोजन केले आहे त्या बद्दल त्यांच्या कार्याला शुभेच्छा दिल्या, सूरज दादा चव्हाण बोलताना म्हणाले की आमचे आदरणीय नेते खा,शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या शिकवणी नुसार 80 टक्के समाजकारण आणि 20 टक्के राजकारण ही शिकवण डोळ्यासमोर ठेऊन ग्रामीण भागातील जनतेला दृष्टी मिळावी ,अस्थीव्यंग रुग्णांना चालता यावे कर्णबधीर रुग्णांना ऐकता यावे यासाठी या शिबिराचे आयोजन केले आहे येत्या 15 दिवसात श्रवण यंत्र ,कृत्रिम अवयव ,चष्म्याचे वाटप करण्यात येईल असे उपस्थित रुग्णांना यावेळी चव्हाण यांनी शब्द दिला ,तहसीलदार जटाळे यांनी ही मनोगत व्यक्त केले ,या शिबिराचा लाभ तालुक्यातील 700 रुग्णांनी घेतला आहे ,

या शिबिरासाठी संयोजक समितीने परिश्रम घेतले आहे त्यात तालुका अध्यक्ष विठ्ठलराव पाटील ,कार्यध्यक्ष अब्दुल अजीज मुल्ला ,शेख महेताब , शहर अध्यक्ष अनिल देवग्रे ,सुरज दादा चव्हाण फाऊंडेशन चे अध्यक्ष सुचित लासूणे,बबन होनमाणे ,राजू बर्गे ,ज्ञानोबा मोगले ,नंदू तांबोलकर ,विवेक घारोळे ,ओम जक्तप ,ऋत्विक सांगवे ,शुभम ऐतंनबोने ,रोहित तांदळे ,खंडू पाटील ,अविनाश चव्हाण ,शुभम जाधव ,माधव संभाळे ,नगरशेवक संतोष शिवणे ,श्रीदेवी संभाळे ,राजनंदिनी तांदळे ,सचिन गुगळे ,गोपाळ अण्णा हदराळे ,नामदेव लोखंडे ,केदार लोंढे ,प्रमेशवर जलकोटे ,आदींनी परिश्रम घेऊन हे शिबीर यशस्वी केले या शिबिराचे सूत्रसंचालन व प्रास्ताविक युवा नेते महादेव आवाळे यांनी केले तर आभार शेख महेताब यांनी मानले ,