युक्रेनमधून फातिमा शेख सुखरूप चिखलीला परत येत आहे:- आमदार श्वेताताई महाले पाटील

36

✒️अंबादास पवार(विशेष प्रतिनिधी)

चिखली(दि.2मार्च):- युक्रेनची सरहद्द ओलांडणे म्हणजे मृत्यूच्या दाढेतून जिवंत परतण्यासारखे आहे. अशा बिकट परिस्थितीत माझ्या मतदारसंघातील कु. फातिमा शेख या विद्यार्थिनीशी मी फोनवरून संपर्क साधला आणि तिला धीर दिला. तिला परत आणण्यासाठी जिल्हा प्रशासन ते परराष्ट्र मंत्रालयापर्यंत पाठपुरावा केला आणि अखेर ही हिंमतवान विद्यार्थिनी मोठ्या हालअपेष्टा सोसत रोमानियात पोचली असून भारतीय दूतावासाच्या मदतीने तिचा भारताकडे प्रवास सुरू झाला आहे.कु. फातिमाचे वडील चिखली येथील एका उर्दू शाळेमध्ये लिपिक आहेत. त्यांच्याशीही फोनवरून संपर्क साधून त्यांना आश्वस्त केले.

आणि सामान्य मध्यमवर्गीय परिवारातील मुलीला परदेशात शिकण्याची परवानगी दिल्याबद्दल मा. मोहम्मद शेख यांचे अभिनंदन केले. शेख कुटुंबीयांनी दाखवलेल्या या धैर्याबद्दल फातिमा परत आल्यानंतर तिचा सहकुटुंब सत्कार करणार आहे.लवकरच कु. फातिमा मायदेशी परत येईल. चिखलीत स्वतःच्या घरी येईल. युक्रेनमध्ये अडकलेला माझ्या मतदारसंघातील प्रत्येक नागरिक जोवर घरी परत येत नाही तोवर मी त्यांच्या सुखरूप सुटकेसाठी अथक प्रयत्न करत राहीन.फातिमा शेख हिच्या परतीच्या प्रवासातून इतरांना हिंमत मिळावी म्हणून तिने आमदार श्र्वेताताई महाले यांना पाठवलेले पत्र येथे सर्वांसाठी शेअर करत आहे…