डोंगरी जन परिषदेच्या वतीने डोंगरी भागातील शेतकऱ्यांचे एक गाव एक दिवस साखळी उपोषणाचा बारावा दिवस

33

✒️अनिल साळवे(गंगाखेड प्रतिनिधी)

गंगाखेड(दि.5मार्च):-आता तरी जागे व्हा सरकार अखंड परिश्रम,मेहनती व खडतर प्रवास डोंगरी जन परिषदेच्या वतीने डोंगरी भागातील शेतकऱ्यांचे एक गाव एक दिवस साखळी उपोषणाचा बारावा दिवस गेल्या बारा दिवसांपासून गंगाखेड तालुक्यातील डोंगरी भागातील शेतकरी आंदोलन करतं आहेत आणि आपल्या मागण्या समर्पकपणे मांडण्यासाठी लढा देत आहेत. पण या सरकारला जाग येण्याची काही संभावना दिसत नाहीये,तेव्हा डोंगरी जन परिषदेच्या शेतकरी बांधवांनी आपला लढा आणखी तीव्र करण्याचे निश्चित केले आहे.

आज बाराव्या दिवशी दिनांक ०५/०३/२०२२ रोजी डोंगरी जन परिषदेचे शेतकरी बांधव तितक्याच जोशाने लढा देत आहेत जो उत्साह पहिल्या दिवशी होता यामधे आज “खोकलेवाडी या गावच्या शेतकरी बांधवांनी यामध्ये उत्स्फर्तपणे सहभाग नोंदवला.
2018 सालीच्या कोरड्या दुष्काळाचे हेक्टरी 6800 रुपये अनुदान देण्यात यावे 2020 चा पिकविमा आद्याप देण्यात आलेला नाही तो देण्यात यावा.व तसेच 2021 सालचा पिकविमासुध्दा आणखी मंजूर करण्यात यावा यासारख्या अनेक मग्ण्याकरिता डोंगर भागातील शेतकऱ्यांचे डोंगरी जन परिषदेच्या वतीने साखळी उपोषण सुरू केले.
दिनांक २२/०२/२०२२ मंगळवारी रोजी डोंगर भागातील शेतकऱ्यांचे श्री संत जनाबाई मंदिरा पासून वाजत गाजत भव्य रॅली काढुन पहिल्या दिवशी डोंगरगाव येथील 200 शेतकरी बांधवासह अनेक गावातील शेतकरी बांधवांनी सहभागी होवून साखळी उपोषणाला यशस्वी सुरुवात केली.

डोंगर भागातील प्रत्येक गावातील “प्रत्येक दिवशी एक गाव” याप्रमाणे शेतकरी उपोषणाला बसणार होते त्याप्रमाणे
दुसऱ्या दिवशी म्हणजेच दिनांक 23 फेब्रुवारी रोजी डोंगरजवळा येथील शेतकरी गंगाखेड तहसील कार्यालय समोर बेमुदत साखळी उपोषणात उत्स्फूर्तपणे सहभागी झाले .आणि तीसर्या दिवशी दिनांक २४/०२/२०२२ रोजी मानकादेवी येथील शेतकरी बांधव उपोषणाला बसले होते .तसेच आंदोलनाच्या चौथ्या दिवशी म्हणजेच दिनांक २५/०२/२०२२ रोजी शेंडगा गावचे अनेक शेतकरी बांधव या लढ्यामध्ये सहभागी झाले होते .आंदोलनाचा पाचवा दिवस २६/०२/२०२२ रोजी डोंगरी जन परिषदेचे शेतकरी बंधू आपला लढा प्रखाराने देत पिंपळदरी या गावच्या शेतकरी बांधवांनी यामध्ये उत्स्फर्तपणे सहभाग नोंदवला.तर सहावा दिवशी दिनांक २७/०२/२०२२ रोजी डोंगरी जन परिषदेचे शेतकरी बांधव तितक्याच जोशाने आपला लढा प्रखाराने देत,*पडेगाव* या गावच्या शेतकरी बांधवांनी यामध्ये उत्स्फर्तपणे सहभाग नोंदवला.

व तसेच *सातव्या दिवशी दिनांक २८/०२/२०२२ रोजी आरबुजवाडी*गावच्या शेतकरी बांधवांनी सहभाग नोंदविला होता.आठव्या दिवशी दिनांक ०१/०३/२०२२ रोजी डोंगरी जन परिषदेचे शेतकरी बांधव तितक्याच जोशाने लढा देत आहेत जो उत्साह पहिल्या दिवशी होता यामधे *”धनगरमोहा* या गावच्या शेतकरी बांधवांनी यामध्ये उत्स्फर्तपणे सहभाग नोंदवला.*नव्वया दिवशी म्हणजे ०२/०३/२०२२ रोजी पोखर्णी* या गावच्या शेतकरी बांधवांनी उपस्थिती दर्शविली.*दहाव्या दिवशी दिनांक ०३/०३/२०२२ रोजी आंतरवेली* गावचे अनेक शेतकरी बांधव उपस्थित होते.अकराव्या दिवशी दिनांक ०४/०३/२०२२ रोजी डोंगरी जन परिषदेचे शेतकरी बांधव यामधे आज “बोर्डा* या गावच्या शेतकरी बांधवांनी यामध्ये उत्स्फर्तपणे सहभाग नोंदवला.तरी आपण सर्व बांधवांनी एकजूट करून आपल्या मागण्या पूर्ण करून घेण्यासाठी एकत्रतितपणे येऊन प्रयत्न करायला हवेत….. *कारण ही लढाई आहे ही आपल्या शेतकरी बांधवांची… तुमची…आमची