प्रा.डॉ.रवींद्र विखार यांच्या आदिवासी समाजाचे समाजशास्त्र या पुस्तकाचे विमोचन

32

✒️रोशन मदनकर(उप संपादक)

ब्रह्मपुरी(दि.5मार्च):- श्री. गोविंदराव मुनघाटे कला व विज्ञान महाविद्यालय कुरखेडा येथील समाजशास्त्र विभाग प्रमुख तथा विदर्भ मराठी समाजशास्त्र परिषदेचे सचिव प्रा .डॉ रवींद्र विठोबा विखार यांच्या आदिवासी समाजाचे समाजशास्त्र या बी .ए.अंत च्या सहाव्या सेम च्या पुस्तकाचे विमोचन गोंडवाना विद्यापीठाचे कुलगुरू डॉ प्रशांत बोकारे यांच्या हस्ते करण्यात आले. विदर्भ मराठी समाजशास्त्र परिषद चे बारावे राज्यस्तरीय अधिवेशन मीडॉळा येथील महात्मा फुले -डॉ.बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालय इथे पार पडले.

अधिवेशनाचे उद्घाटन गोंडवाना विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. प्रशांत बोकारे यांच्या हस्ते तर प्रमुख बीजभाषण म्हणून अमरावती विद्यापीठाच्या समाजशास्त्र विभागाचे प्रा. डॉ.किशोर राऊत ,गोंडवाना विद्यापीठाच्या समाजशास्त्र अभ्यास मंडळाचे अध्यक्ष तथा समाजशास्त्र विभागप्रमुख प्रोफेसर डॉ.धनराज पाटील ,एडवोकेट अमर खंडाळे, परिषदेचे अध्यक्ष तथा महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.बी एम कराडे , प्रा. नामदेवराव वरभे प्रा. डॉ.अशोक सालोडकर यांच्या उपस्थित संपन्न झाले . प्रा .डॉ. रवींद्र विखार यांचे हे सहावे पुस्तक असून गोंडवाना विद्यापीठाच्या नवीन अभ्यासक्रमावर आधारित तयार केलेला आहे .

विद्यार्थी ,संशोधक विद्यार्थी व स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या सर्वांना निश्चित या पुस्तकाचा उपयोग होईल असा आशावाद मान्यवरांनी व्यक्त केला.संपूर्ण कार्यक्रमाचे संचालन परिषदेच्या कोषाध्यक्ष प्रा.डॉ.स्निग्धा कांबळे व आभार प्रा.डॉ. रवींद्र विखार यांनी मानले. सदर परिषदेला विविध महाविद्यालयातील अनेक प्राध्यापक, संशोधक विद्यार्थी उपस्थित होते.