मा. श्री धवलसिंह मोहिते-पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त मोहोळ नगरीतील नागनाथ महाराज अभिषेक

35

🔸स्वामी कुटुंबियांचा उपक्रम

✒️मोहोळ(तालुका प्रतिनिधी-नानासाहेब ननवरे)मो:-9922358308/9834293423

कुरुल(दि.5मार्च):-सोलापूर जिल्हा जनसेवा संघटनेच्या महिला अध्यक्ष सौ कल्पना ताई स्वामी व त्यांचे पतीस शैलेश स्वामी यांच्या कुटुंबियाकडून मोहोळ येथील नागनाथ महाराज मंदिरामध्ये सोलापूर जिल्ह्याचे काँग्रेस जिल्हाध्यक्ष व जनसेवा संघटनेचे अध्यक्ष माननीय श्री धवलसिंह मोहिते पाटील यांच्या जन्मदिनाचे औचित्य साधून नागनाथ महाराजांना अभिषेक करण्यात आला

व त्यांना आरोग्यदायी जीवन लाभो हीच प्रार्थना स्वामी कुटुंबियाकडून करण्यात आली. त्यावेळी जनसेवा सोलापूर जिल्हा महिला अध्यक्ष कल्पनाताई स्वामी, शैलेश स्वामी दयानंद स्वामी महादेवी स्वामी जनसेवा संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.