ओबीसीं समाजाचे सोमवारला चिमुरात चक्काजाम आंदोलन

115

🔹आंदोलनात सहभागी होण्याचे राष्ट्रीय ओबीसी महासंघ चिमुर आवाहन

✒️सुयोग सुरेश डांगे(विशेष प्रतिनिधी)

चिमुर(दि.6मार्च):-ओबीसी समाजावर राजकिय, शैक्षणीक , नोकरी, व इतर क्षेत्रात मोठ्या प्रमाणात अन्याय केला जात आहे.ओबीसी समाजाची सर्व क्षेत्रात पिळवणूक केली जात आहे.

जातिनिहाय जनगणना, स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये गेलेले राजकीय आरक्षण, ओबीसी विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह सुरू करणे, विद्यार्थ्यांना १०० टक्के ओबीसी स्कालरशिप, ओबीसी शेतकऱ्यांना योजना ,वर्ग ३ व ४ची नोकरभरती सुरू करणे, ओबीसी समाजातील मुलांना गणवेश वाटप आदी मागण्याकरिता सोमवारला १.०० वाजता तहसिल कार्यालय समोर चक्का जाम आंदोलन करण्यात येणार आहे.

तरी सर्व ओबीसी बांधवांनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित दर्शवावी असे आवाहन राष्ट्रीय ओबीसी महासंघ चिमुर , राष्ट्रीय ओबीसी यूवा महासंघ चिमुर, राष्ट्रीय ओबीसी महिला महासंघ चिमुर कडून करण्यात येत आहे ‌.