ज्ञानदिप प्रशासकीय महाविद्यालय चौगान, येथे जागतिक महिला दिनाचा कार्यक्रम संपन्न

42

🔸वृक्षारोपण,रांगोळी स्पर्धा घेण्यात आल्या, मुलींना सेल्फ डिफेन्स इत्यादी बद्दल मार्गदर्शन करण्यात आले

✒️रोशन मदनकर(उप संपादक)

ब्रम्हपुरी(दि.8मार्च):-आज दिनांक 8 मार्च, मंगळवार ला ज्ञानदिप प्रशासकीय महाविद्यालय चौगान, येथे जागतिक महिला दिनानिमित्त विद्यार्थ्यांच्या सुप्त कलागुणांना वाव मिळावा व मुलींना या दिनानिमित्त शैक्षणिक प्रशासकीय आणि संरक्षणार्थ माहिती व्हावी साठी वेगवेगळे कार्यक्रम आयोजित करण्यात आले. कार्यक्रमाला उपस्थित अध्यक्ष म्हणून लाभले महाविद्यालयाचे प्राचार्य सुमेध वालदे सर,प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेले ग्रामीण रुग्णालय चौगान येथील डॉ.सौ सुखदेवे मॅडम, तसेच दुसऱ्या प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेले स्वर्गीय राजीव गांधी कृषी तंत्र निकेतन येथील प्राचार्य हाश्मी मॅडम, कृपाकरजी चहांदे सर, सौ. शीला ताई चहांदे उपस्थित होत्या, व महाविद्यालयातील प्राध्यापिका सौ. तोंडरे मॅडम, सौ. प्रधान मॅडम, सौ. पुणेकर मॅडम, कुमारी मैन्द मॅडम,व शिपाई कर्मचारी बुराडे बाई उपस्तित होत्या या कार्यक्रमाप्रसंगी वृक्षारोपण,रांगोळी स्पर्धा घेण्यात आल्या, मुलींना सेल्फ डिफेन्स इत्यादी बद्दल मार्गदर्शन करण्यात आले. कार्यक्रमाप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेल्या उपस्थित असलेल्या चौगान ग्रामीण रुग्णालय येथील सौ डॉ. सुखदेवे मॅडम यांनी विद्यार्थ्यांना वेळेचे नियोजन करून चालणारा व्यक्ती समोर जातो असे मार्गदर्शन केले मुलींना किशोरावस्थेत होणारे बदल घ्यावयाची काळजी यावर मार्गदर्शन केले त्यानंतर कृषी तंत्रा निकेतन महाविद्यालयाच्या प्राचार्य हस्मी मॅडम यांनी विद्यार्थ्यांना अभ्यासाचे मार्गदर्शन केले व मुलींना मिळालेला अधिकाराचे गैरवापर करू नये मार्गदर्शन केले तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य सुमेध वालदे सरांनी प्राचीन व आधुनिक स्थिती त्यामधील फरक समजावून सांगितला.

त्यांना मिळालेले हक्क आणि अधिकार समजून दिले व महिला दिवस का म्हणतात ते समजून सांगितले तसेच प्राध्यापक प्रधान मॅडमनी महिला दिवसाची सुरुवात कशी झाली व मिळालेल्या अधिकाराचा गैरवापर होऊ नये यावर मार्गदर्शन केले.प्राध्यापक पुणेकर मॅडम यांनी मुलींनी जीवन जगताना कशा पद्धतीने जीवनात सामोर जावे त्यावर मोलाचे मार्गदर्शन केले प्राध्यापक प्रधान सर यांनी मुलांना अभ्यासात्मक मार्गदर्शन केले व सर्व प्राध्यापक महिला व मुलींना शुभेच्छा दिला व कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापिका सौ.तोंडरे मॅडम, यांनी केले तर कार्यक्रमाच्या प्रास्ताविक प्राध्यापिका कुमारी, मैंद मॅडम यांनी केले शेवटचा टप्पा आभार प्रदर्शन प्राध्यापिका सौ. पुणेकर मॅडम यांनी केला व कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.