उत्तमराव माझे विद्यार्थी आहेत ही माझी भुषणावह बाब आहे – प्रा. अनंत हंबर्डे

54

✒️आष्टी प्रतिनिधी(सौ.सरस्वती लाड)

आष्टी(दि.9मार्च):-पत्रकार उत्तमराव बोडखे आज ५४ वर्ष पुर्ण करीत आहेत. आष्टी तालुक्यातील प्रथितयश पत्रकारिता उत्तमरावने केली आहे. ते उच्च विद्याविभूषित आहेत. पत्रकारच व्हावे म्हणूनच त्यांनी स्वत:ला घडविले. त्यांना नौकरी मिळणे सहज शक्य असतांना त्यांनी हे वाण हाती घेतले. माझ्या महाविद्यालयातील ते एक हुशार विद्यार्थी होते. १९८६ साली त्यांनी माझ्या कॕबीनमध्ये येऊन मला स्पेशल मराठी विषय घ्यायचाय असे म्हटले. त्यांच्यासोबत ॲड. रत्नदीप निकाळजे (सध्या प्रसिद्ध वकील, आष्टी न्यायालय), प्रा. सुनिल शिंदे (प्राचार्य इंदिरा कन्या विद्यालय धामणगांव), प्रा. सुभाष शिंदे (सध्या अंबाजोगाई येथील योगेश्वरी कनिष्ठ महाविद्यालयात प्राध्यापक) आहेत. उत्तमरावांनी मराठी विषयात पदव्युत्तर पदवी घेतली आहे.

वेगवेगळ्या वर्तमानपत्रात उमेदीच्या काळात लिहित राहिले. स्वत:चे साप्ताहिक चालविले पण “ ते रमले, ते फक्त झुंजारनेता ” ह्याच दैनिकात. झुंजारनेता त्यांचा श्वास झाला. झुंजारनेताने त्यांची अलिकडेच उपसंपादकपदी निवड केलेली आहे. दैनिक झुंजारनेता परिवारातील योगदानाबद्दल त्यांना न्याय दिला आहे. दैनिक झुंजारनेतात उत्तमराव इतके समरस नव्हे एकरूप झाले आहेत. मोतीरामजी वरपे (दादा) यांची माया त्यांना लाभली. त्यांचे हे प्रतीक आहे. त्यांचे लिखान चौफेर आहे.

आष्टी तालुक्यात त्यांचा लोकसंग्रह आणि लोकसंपर्क फार मोठा आहे. कोणत्याही पक्षाचा नेता आणि त्यांचा पक्ष त्यांना अस्पृश्य नाही. उत्तमरावांना वगलळ्यास तालुक्यातील पत्रकारिता खुजी दिसू लागेल.आष्टी तालुक्यातील पहिल्या दहा लोकांमध्ये त्यांची गणना होत आहे. त्यांना ओळखीत नाही असा मनुष्य तालुक्यात विरळा आहे. उत्तमरावजी पत्रकारिता क्षेत्रातील बहिर्जी नाईकच. राजकारण, क्रीडा, अध्यात्म, शेती, सहकार, शिक्षण, समाजकारण अशा विविध क्षेत्रात त्यांची लेखणीचा “स्वैर संचार ” असतो. ते माझे विद्यार्थी आहेत. हे मला भूषणावह बाब आहे. महाराष्ट्रातील सीनेक्षेत्रातील, राजकीय व्यक्ती, अध्यात्मातील श्रेष्ठ व्यक्ती त्यांना जवळून ओळखतात. त्यांना दिर्घायू आणि आरोग्य, कीर्ती, यश लाभो ही मनोमन मनिषा…..
उत्तमरावांनी वारकरी संप्रदायातील आठ संतांचे सारांशरूपी जीवन चरित्र लिहले तर त्यांना घडविणारे झुंजारनेताचे संस्थापक संपादक स्व. मोतीरामजी वरपे (दादा) यांच्या जीवनावर लेखन करून “नव रत्न’ नावाचे पहिले पुस्तक मागील वाढदिवसाच्या निमित्ताने प्रकाशित केलेले आहे. वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा…..!!!