नांदगाव खंडेश्वर धारणी येथे कंपोस्ट डेपो करता जागा निश्चित जागेच्या मंजुरीकरिता प्रस्ताव महसूल विभागाकडे दाखल जिल्हाधिकाऱ्यांचा मिळाला ग्रीन सिग्नल

28

✒️प्रदिप रघुते(अमरावती प्रतिनिधी)मो:-9049587193

अमरावती(दि.10मार्च):-जिल्ह्यातील नांदगाव खंडेश्वर आणि धारणी नगर पंचायतमध्ये कंपोस्ट डेपो करिता जागा निश्चित करण्यात आली असून याबाबतचा आढावा घेऊन जिल्हाधिकारी यांच्या मार्फत सदरचा प्रस्ताव जागेच्या मंजुरीचा प्रस्ताव महसूल विभागाकडेसादर करण्यात आला आहे त्यामुळे महसूल विभागाच्या मंजुरीनंतर दोन्ही नगर पंचायतीची कंपोस्ट डेपोची समस्या कायमची सुटणार आहे.शहर स्वच्छ आणि सुंदर असावे याकरिता शासनाकडून स्वच्छ मिशन अभियान राबविले जात आहे या अंतर्गत शहरातील कचरा गोळा करून तो गावापासून दूर कंपोस्ट डेपो तयार करून तिथे टाकला जातो परंतु जिल्ह्यातील नांदगाव खंडेश्वर आणि धारणी या दोन्ही नगर पंचायतीमध्ये कंपोस्ट डेपोकरिता नियोजित जागा नसल्याने नागरिकांसह प्रशासनाला अडचणीचा सामना करावा लागत आहे.

नांदगाव खंडेश्वर येथील खंडेश्वर मंदिरासमोरील जागेवर कचरा टाकला जात आहे त्यामुळे भक्तांच्या भावना दुखावल्या जात असताना प्रशासनाकडून येथे कंपोस्ट डेपो करिता तीन जागांची पाहणी करण्यात आली होती त्या रद्द झाल्या परंतु आता नव्याने पहुर गावातील एका जागेचा प्रस्ताव जिल्हाधिकारी यांच्याकडे पाठविण्यात आला आहे सोबतच धारणी नगरपंचायतीमध्ये देखील अमरावती परतवाडा महामार्गावरील एका जागेचा प्रस्ताव तयार करून तो जिल्हाधिकारी यांच्याकडे मंजुरीकरिता पाठविण्यात आला होता याबाबत जिल्हाधिकारी यांनी आढावा घेऊन दोन्ही जागेच्या मंजुरीकरिता भूसंपादन विभागाकडे पाठविण्यात आलेला आहे सदरच्या जागा नगरपंचायतीना हस्तांतरित करीत तेथे पुढील प्रक्रिया केली जाणार आहे त्यामुळे लवकरच दोन्ही नगरपंचायतीच्या कंपोस्ट डेपोची समस्या कायमची सुटणार आहे नांदगाव खंडेश्वर येथे मात्र संबंधित ग्रामपंचायतीच्या एनओसी अभावी नगरपंचायला अडचणीचा सामना करावा लागत असल्याने ती समस्या सुद्धा लवकरच सोडवून सदरची प्रक्रिया लवकरच पूर्ण करण्यात येऊन निकाली काढण्यात येणार आहे या बाबतचा आढावा जिल्हाधिकारी यांनी घेऊन दोन्ही जागेच्या मंजुरी करिता ग्रीन सिग्नल दिलेला आहे त्यामुळे नगर पंचायतीचा कंपोस्ट डेपोचा प्रश्न कायमचा निकाली निघणार आहे.