प्रकाशझोतापासून वंचित महिला हिरकणी पुरस्काराने सन्मानित

29

✒️पुणे(पुरोगामी न्युज नेटवर्क)

पुणे(दि.10मार्च):- विविध क्षेत्रात उत्तुंग काम करणार्‍या महिलांचा गौरव होत असतोच पण समाजात मोलाचे काम करणार्‍या, कुटुंबाचा उदर निर्वाह करण्यासाठी, कोणतेही कष्ट करण्यासाठी झटणार्‍या अशा कष्टकरी महिला आणि समाज कार्य करणार्‍या महिला अशा सन्मांनान पासून आणि प्रकाशझोतापासून वंचितच राहतात.अशाच छत्रपती शिवाजी महाराज नगर भागातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केलेल्या 30 महिलांचा आंतरराष्ट्रीय महिला दिवसाचे औचित्य निमित्त ‘हिरकणी पुरस्कार’ देवून सन्मान करण्यात आला.शाल श्रीफळ, सन्माचिन्ह फेटा असे पुरस्काराचे स्वरूप होते. हा कार्यक्रम कारभारी आण्णा चॅरिटेबल फाऊंडेशन आणि संध्या भोसले व राहुल भोसले मित्र परिवार आयोजित केला असून काल 9 मार्च 2022 रोजी पं . जवाहरलाल नेहरु सांस्कतिक भवन घोले रोड , छ . शिवाजी महाराज नगर , पुणे येथे संपन्न झाला.

या प्रसंगी रमेश बागवे (शहराध्यक्ष,पुणे शहर जिल्हा काँग्रेस), .दत्ता बापू बहिरट ( मा. अध्यक्ष विधीसमिती), मोहन जोशी (माजी आमदार), दिप्तीताई चौधरी (माजी आमदार), डॉ. हाजी जाकिर शेख (सरचिटणीस महाराष्ट्र्र प्रदेश काँग्रेस कमिटी), पूजा आनंद (महिला शहराध्यक्ष,पुणे शहर काँग्रेस), गौरव बोराडे, सोमेश्‍वर बालगुडे, बाळासाहेब बाणखेले उपस्थित होते. केएसीएफ फाऊंडेशन, रूपाली स्पोर्टस क्लब, मानव प्रतिष्ठान सर्व पदाधिकारी व कार्यकारी सदस्य आणि राहुल भोसले मित्र परिवाराचे विशेष सहकार्य लाभले.

पुरस्कार मानकरी ठरलेले : 1) कु. स्मिता जयकिरण सोदे-कराटे प्रशिक्षक, 2) सौ. इंदूबाई गोविंद गोजारे, 3) सौ. पुनम हरिभाऊ शिंदे, 4) सौ. हेमा सचिन दातखिळे , 5) सौ. शालिनी मारूती रायकर (आदर्शमाता), 6) सिंधु बापू शिरसाट (स्वच्छ सेवा सेवक), 7) अ‍ॅड. सौ. ज्योती रणजीत भोंडवे, 8) शैनाज रफिक शेख, 9) सौ. भारती शहाजी खेडेकर, 10) सौ. रतन चद्रकांत मोरे, 11) श्रीमती, सुवर्णा नितीन परदेशी, 12) सौ. वैजयंती शांताराम सोवळे, 13) श्रीमती सुनिता शिवाजी पवार , 14) दिपा राजू भेकरे , 15) डॉक्टर कु.मोनिका मोहन पानसरे, 16)सौ.आरती विकास मेस्त्री(मळेवाडकर)(दैनिकसकाळ पत्रकार), 17) सौ. मिनिता शरद पाटील (समाजसेविका), 18) कु.मोनिका प्रशांत टेंबरे (रांगोळी कलाकार), 19) कु.राजश्री रामु संघाटी (‘प्रोफेसर’), 20) हिरा सिद्धपा शिवांगी (अंगणवाडी शिक्षिका), 21) सौ.पूनम अमित तिवारी (शिक्षिका), 22) सौ. रेखा नारायण जाधव, 23) सुरेखा आनंद गायकर (शिक्षिका), 24) लता दिलीप पाकेरे (अंगणवाडी शिक्षिका),
25) सौ. स्नेहल शंकरराव सोरटे (व्यवसाय), 26) सौ. वीणा नितिन कुढले. (बी.ए. संगित विशारद), 27) जमुनाताई लक्ष्मन माने, 28) सौ.सुजाता शिवा माळी.

सदर बातमी आपल्या लोकप्रिय दैनिकातून प्रसिद्धीस द्यावी..

अधिक माहितीसाठी संपर्क :
सौ . संध्या राहुल भोसले, श्री . राहुल ज्ञानेश्‍वर भोसले ( पुणे शहर काँग्रेस )
8888301818

फक्त आपल्या माहितीसाठी :
1) कु. स्मिता जयकिरण सोदे-कराटे प्रशिक्षक
आपल्या जगातील मुलींची परिस्थिती पाहता स्मिताने स्वत: कराटे क्लास करून ठसंबा ठमसज मिळवून इतर मध्यमवर्गीय मुलींना व महिलांना स्वत:चे संरक्षण कसे करता येईल या हेतुने स्मिताने स्वत: कराटे क्लास चालू केले आहे.
2) सौ. इंदूबाई गोविंद गोजारे
या ताई अशिक्षित आहे.वयाच्या 22व्या वर्षी त्यांच्या पतीला अपंगत्व आल्यामुळे त्यांनी नंतर धुणी भांडी करून 3 मुलांचा सांभाळ केला त्यातुन 2 मुलांना पोलीस बनविले व मुलीचे लग्न करून दिले, आणि आता पतीसाठी अजुनही कामे करत आहे.
3) सौ. पुनम हरिभाऊ शिंदे
वयाच्या 18 व्या वर्षी निराधार सासर व माहेरच्यांनी सोडल्यानंतर पदरात 3 मुले होती, अती कष्ट करुन तिने एका मुलाला स्टेट लेव्हल व्हॉलीबॉल प्लेअर केले. तर दूसरा समाजसेवक व ग्राफिक डिझाइनिंग करतो. मुलगी फायनान्स मध्ये जॉब करते.
4) सौ. हेमा सचिन दातखिळे
या हेमाताई प्रत्येक वस्तीपातळीवर काम करतात,सध्या महिलांमध्ये कॅन्सरचे प्रमाण फार वाढले आहे तर ते कसे टाळता येईल त्यासाठी महिलांनी स्वत:ची काळजी कशी घ्यावी हे मार्गदर्शन करतात व प्रत्येक घरात जाऊन तरुण मुलींना मासिक पाळी विषयी माहिती देतात.
5) सौ. शालिनी मारूती रायकर (आदर्शमाता)
महात्मा फुले कृषी महाविद्यालयात रोजंदारीवर खुरपणीचे काम करित होत्या,सावित्रीबाई फुले यांच्या नविन कार्याची प्रेरणेने शिक्षण हेच जीवनाच्या प्रगतीचे माध्यम आहे हे लक्षात घेऊन मुलाला पोलिस अधिकारी केले. त्यांचा मुलगा वारजे पोलिस स्टेशन येथे‘सहा्ययक पोलिस निरीक्षक’ या पदावर कार्यरत आहे.
6) सिंधु बापू शिरसाट
(स्वच्छ सेवा सेवक)
सिंधूताई गेली 10 वर्षापासुन स्वच्छ संस्थेबरोबर ‘कचरा संकलणा’चे काम करित आहे मुळारोड लक्ष्मीनारायण कुंज या गृहसंस्थेतील गांडुळखत प्रकल्प हयांनी यशस्वीपणे चालू ठेवल्याने महापालिका आयुक्तांनी त्यांची प्रंशसा पण केली आहे.
7) अ‍ॅड. सौ. ज्योती रणजीत भोंडवे
(वकिल) ठैस्ण्स्स्ठण् स्स्डण् क्स्स् – स्ॅए क्ब्ल्स्ए डैॅ ंचच
ज्योती ताईंनी लग्नानंतर स्स्ठ करून बाकि पदव्या प्राप्त केल्या. सध्या सायबर लॉ आणि डैॅ चे शिक्षण घेत आहेत. जिल्हा प्रमुख विधी सल्लागार पश्‍चिम महाराष्ट्र पोलिस मित्र परिवार समन्वय समिती तेजस्विनी संस्था सदस्य, महिला फांऊडेशन सदस्य अशा विविध पदांवर कार्यरत असून सेवाकार्य करित आहेत.
8) शैनाज रफिक शेख
शैनाज दिदी प्रत्येक वस्तीत जाऊन 3 वर्षाच्या आतील मुलांचे संगोपन कसे करावे या विषयी माहिती देतात, महिला सक्षमीकरण करतात.डि.वाय पाटीलच्या डॉक्टरांकडून मुलांचे मोफत उपचार करुन घेणे, त्यांच्या कंपनी कडून कोर्ससाठी 75: फी मिळवुन देणे.
9) सौ. भारती शहाजी खेडेकर
भारती ताईची परिस्थिती अतिशय बिकट असताना मुलीने हटट् केला
कि मला डॉक्टरच व्हायचे, तिच्या हटट्ांमुळे त्यांनी बचत गटातून
कर्ज घेऊन मेस चालू केली व आज मुलगी डॉक्टर झाली.
(डॉक्टर करिष्मा शहाजी खेडेकर)
10) सौ. रतन चद्रकांत मोरे
वयाच्या 21व्या वर्षापासून घरकाम करत असुन त्यांच्या मार्गदर्शनामुळे आज रतनताईची मुलगी अमेरिका येथे जॉब करते व मुलगा इंजिनियर आहे.

11) श्रीमती, सुवर्णा नितीन परदेशी
सुवर्णाताईना वयाच्या 25व्या वर्षी विधवापण आले, जवळ तर 2 मुले होती, म्हणून स्वत: टेलरिंगचा क्लास केला. व आता स्वत: फॅशन डिझायनिंगचे क्लास घेतात.
12) सौ. वैजयंती शांताराम सोवळे
महिलांसाठी बचत गट तयार करणे,महिलांना योजनेविषयी माहिती देऊन फॉर्म भरुन देणे, केक व केटरिंग क्लास घेतात, टिफिन सर्व्हिस चालू आहे.
महिलांना प्रशिक्षण देतात.
13) श्रीमती सुनिता शिवाजी पवार
पती वयाच्या 20व्या वर्षी मयत झाले, टेलरिंग क्लास स्वबळावर चालू केले. आज यशस्वीपणे स्वकष्ट करित आहेत आणि महिलांना स्वावलंबी बनविण्यासाठी प्रयत्न करित आहेत.
14) दिपा राजू भेकरे
असाध्य आजार असलेला मुलाचा सांभाळ करित आहेत, जिदद्ीने कष्ट करून मुलाचा उपचार आणि सांभाळ करित आहेत,
15) डॉक्टर कु.मोनिका मोहन पानसरे

डीसीएच बाणेर येथे कोविड काळात निर्भिडपणे रूग्णसेवा, जिवाची पर्वा न करता ‘सेवा हाच धर्म’ हे मानुन रूग्णसेवा केली. सध्या काळेवाडी ‘न्यु थेरगाव हॉस्पिटल’ येथे कार्यरत आहे.
16) सौ. आरती विकास मेस्त्री (मळेवाडकर)
(दैनिक सकाळ पत्रकार)
2008 पासुन पत्रकारीतेला सुरूवात, दैनिक पुढारी, प्रभात मध्ये उपसंपादक व बातमीदार म्हणून काम केले. तसे आकाशवाणीच्या वृत्तविभागात वृत्त निवेदक म्हणुन काम केले, सध्या दैनिक सकाळ मध्ये एक निर्भिड पत्रकार म्हणून कार्यरत आहेत.
17) सौ. मिनिता शरद पाटील
(समाजसेविका)
दिव्यांगाना स्वावलंबी आणि आत्मनिर्भर बनविण्यासाठी गेली 40 वर्षे बालकल्याण संस्था आणि अभिसार यां छळव् मार्फत समाज काम करित आहेत, भीमथडी जत्रेत अभिसार फाऊंडेशनच्या वतीने दिव्यांगानी बनविलेल्या वस्तूंचा स्टॉल च्या द्वारे त्यांनी विक्रिचे व्यापारी दालन उपलब्ध करून दिले.
18) कु.मोनिका प्रशांत टेंबरे
(रांगोळी कलाकार)
मोनिका एक उत्तम रांगोळी कलाकार आहे. आज आपल्या कार्यक्रमाच्या प्रवेशद्वारावर पाहिलेली अतिसुंदर रांगोळी मोनिकाने रेखाटली आहे. तिचे कलागुण पाहुन तिच्या कलाकृतीची दखल दै. सकाळ ने आपल्या वृत्तपत्रात घेतली आहे. ती श्रीरंग कलादर्पण या रांगोळी क्लासेस सोबतही काम करते.
19) कु.राजश्री रामु संघाटी
(‘प्रोफेसर’)
राजश्रीताईंनी आपल्या दिव्यांगावर मात करून उच्चशिक्षण पुर्ण केले. सध्या त्या स्वराज महाविद्यालयात तळजाई पणर येथे प्रोफेसर आहेत. त्या आपल्या वस्तीतील युवतींसाठी एक आदर्श आहेत.
20) हिरा सिद्धपा शिवांगी
(अंगणवाडी शिक्षिका)
हिराताई यांची दृष्टी कमी असुन त्या अंगणवाडी शिक्षिका आहेत.मुलांना शिक्षणाचे धडे त्या लिलया देतात. ‘जीवनात कितीही अडथळे आले तरी शिक्षण पूर्ण करा असा मुलांना त्यांचा नेहमीच सल्ला असतो.
21) सौ.पूनम अमित तिवारी
(शिक्षिका)
पूनमताई विद्यावर्धिनी इंग्लिश मिडियम शाळेत शिक्षिका असुन त्यांना समाजकार्यातही खुप आवड असून त्यांना समाजकार्यातही खुप आवड आहे. 10वी परिक्षेआधी वस्तीभागातील मुलां-मुलींना त्या मोफत परिक्षापूर्व तयारी करून घेतात.समाजकार्याची आवड असल्याने त्या श्रीयस फाऊंडेशन,राजे विद्या केंद्र आणि कोहिनूर क्रिडा संकुल अशा संस्था सोबत कार्यरत आहेत.
22) सौ. रेखा नारायण जाधव
रेखाताई मातंग एकता आंंदोलन – चाफेकर नगरच्या महिला गटाचे माध्यमातून समाजासाठी काम करित असतात. बचत गटाच्या माध्यमातून महिला सबबीकरण आणि सक्षमीकरण करित आहेत.
23) सुरेखा आनंद गायकर
(शिक्षिका)
सुरेखाताई गेली 36 वर्षेपासून पुणे महानगरपालिकेच्या शाळेत सेवा देत आहेेत. कोव्हिड काळामध्ये वस्तीमध्ये जाऊन कोरोना महामारी विषयी जागरूकता आणि सावधानता बाळगण्यासाठी यांनी खूप प्रयत्न केले,तसेच लसीकरण करण्यासाठी वस्तीतील महिलांना प्रोत्साहित केले.
24) लता दिलीप पोकरे
(अंगणवाडी शिक्षिका)
या ताई गेली 17वर्षे अंगणवाडी शिक्षिका आहे,कोव्हिड काळात घरोघरी जाऊन संक्रमितांचा सर्वे करणे आणि त्यांना कोव्हिड रुग्णालया पर्यंत पोहचविणे,या कामात त्यांनी हिरीरीने पुढाकार घेऊन काम केले.
25) सौ. स्नेहल शंकरराव सोरटे
(व्यवसायिक)
स्नेहल ताईंनी आपल्या सासर्‍यांचा पारंपारिक दूध व्यवसाय होता तोच हाती घ्यायचा निर्णय घेेतला, इंग्रजी माध्यमातील शिकलेली तरुणी एका शेतकरी कुटुंबात आणि व्यवसायात आली.एका आंतरराष्ट्रीय ठच्व् मध्ये रात्रपाळी करुन काम करित दूध व्यवसाय चालविला मग पारंपारिक व्यवसायात त्यांनी नंतर तुप विकायचे ठरविले. पाहता पाहता 30ते35लिटर दूध विकणारी डेअरी आता 100ते 150लिटर दूध घेऊन तुप विकते, यांच्या तुपाला सातासमुद्रापारहि मागणी आहे. मराठी नायिका भार्गवी चिरमुले,विद्या जेम्स अँड डायमंड, असे नामांकित यांचे ग्राहक आहेत.
26) सौ. वीणा नितिन कुढले.
(बी.ए. संगित विशारद)
वीणाताई पुणे म.न.पा.शाळेत उत्तम ‘संगीत विशारद’ घोले रोड क्षेत्रिय कार्यालयाच्या अंतर्गत येणार्‍या सर्व शाळांमध्ये संगीत शिकवणे व मुलामुलींमध्ये संगीताची आवड निर्माण करणे हे त्यांचे महत्त्वाचे काम आहे. हया आस्था कॅन्सर ग्रुप मध्ये समुपदेशक म्हणून काम करतात. आपल्या वार्षिक कमाईतील खारीचा वाटा देऊन आस्था ग्रुपला मदत करतात.गरजू होतकरु मुलांना शालेय साहित्य ही वाटप करतात.
27) जमुनाताई लक्ष्मन माने.
जमुनाताई बचतगट प्रमुख असून शिवाजी नगर रेल्वे स्टेशन भागात सामाजिक काम करित असतात. पोलिस शांतता कमिटी आणि दक्षता कमिटीच्या सदस्या आहेत. वस्तीतील कोणतेही भांडणे घरेलू वाद तंटा हा वस्तीपातळीवरच मिटविण्यात त्यांचा नेहमीच पुढाकार असतो. वस्तीतील महिलांच्या मागे नेहमी त्या आधार म्हणून उभ्या असतात.
28) सौ.सुजाता शिवा माळी.
या महिला श्रमिक कामगार संघटनेत काम करतात.सामाजिक शांतता ठेवणे,तसेच महिला कामगारांचे हक्क व न्यायासाठी त्या सदैव लढा देत असतात. महिला कामगारांना त्यांची मदत नेहमी होत असते.
29) सौ. अनिता राजेंद्र शहाणे
(समाजसेविका )
छ. शिवाजीनगर भागातील असंख्य महिलांचा बचतगट करणे, विविध शासकिय योजना आणि कोर्सेस चा लाभ करून देणे, घरेलु कामगार ई श्रम कार्ड, रेशनिंग कार्ड,वोटींग कार्ड, पॅन कार्ड, आणि इतर असंख्य दाखले काढून देण्यात मोलाचा वाटा आहे.
30) सौ. काजल जितेंद्र घोडके
आजच्या कार्यक्रमाची शोभा ज्यांनी वाढविली व आपल्या सुमधूर वाणीने कार्यक्रमामध्ये रंगत आणली, आकाशवाणी येथे निवेदिका म्हणून कार्यरत असलेल्या काजलताईंचा ही सन्मान…