चार राज्यातील विजयाचा घुग्घुस भाजपातर्फे जल्लोष

31

🔸विजय हा जनतेचा भाजपावर वाढलेल्या विश्वासाचे प्रतीक – देवराव भोंगळे

✒️पंकज रामटेके(घुग्घुस प्रतिनिधी)

घुग्घुस(दि.11मार्च):-गुरुवार 10 मार्च रोजी सायंकाळी घुग्घुस येथील आ. सुधीरभाऊ मुनगंटीवार सेवा केंद्रातून भाजपाचे जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे व भाजयुमोचे प्रदेश उपाध्यक्ष विवेक बोढे यांच्या नेतृत्वात चार राज्यातील विजयाचा घुग्घुस भाजपातर्फे मिरवणुक काढून जल्लोष साजरा करण्यात आला. पाच राज्यातील विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाला यात उत्तर प्रदेश, गोवा, मणिपूर व उत्तराखंड या चार राज्याच्या विधानसभा निवडणुकीत भाजपाला स्पष्ट बहुमत मिळाले त्यामुळे भाजपा नेते, पदाधिकारी, महिला आघाडी व कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन विजय जल्लोष साजरा केला.

याप्रसंगी लाढू वाटप करून फटाक्यांची आतिषबाजी करण्यात आली व बँड पथकाच्या गाजावाज्या सह रॅली काढण्यात आली. ही रॅली आ. सुधीरभाऊ मुनगंटीवार सेवा केंद्रातून निघाली व नवीन बसस्थानक चौक मार्गे आठवडी बाजार, गांधी चौक मार्गक्रमण करून परत आ. सुधीरभाऊ मुनगंटीवार सेवा केंद्रात समाप्त करण्यात आली. चौका चौकात प्रचंड फटाक्यांची आतिषबाजी करून लाढू वाटप करण्यात आले तसेच नारेबाजी व घोषणाबाजी करण्यात आली.मार्गदर्शन करतांना भाजपाचे जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे म्हणाले पाच राज्याच्या निवडणुकीत काँग्रेसचा सुफडा साफ झाला आहे. जनतेने काँग्रेसला नाकारले आहे. देशाला प्रगती पथावर नेण्याचे काम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले गोर गरीब जनतेला मुख्यप्रवाहात आणले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात देश त्यांच्या पाठीशी उभा राहिला, म्हणून अनेक राज्यातील निवडणुका जिंकता आल्या.

यावेळी माजी जिप सभापती नितुताई चौधरी, माजी पंस उपसभापती निरीक्षण तांड्रा, माजी उपसरपंच संजय तिवारी, माजी सरपंच संतोष नुने, राजकुमार गोडसेलवार भाजपाचे जेष्ठ नेते पूनम शंकर, माजी ग्रामपंचायत सदस्य सिनू इसारप,रत्नेश सिंग, सुचिता लुटे, वैशाली ढवस, मल्लेश बल्ला, अमोल थेरे, श्रीकांत सावे, राजेश मोरपाका, अनिल मंत्रिवार, विवेक तिवारी, विनोद जंजर्ला, बबलू सातपुते, दिलीप कांबळे, भारत साळवे, अनंता बहादे, विक्की सारसर, रज्जाक शेख, मंगेश पचारे,हेमंत उरकुडे, सतीश कामतवार, असगर खान, मानस सिंग, सिनू रामटेके, संजय जोगी, नितीन काळे, अनुप जोगी, कोमल ठाकरे, समय्या कटकम, पुष्पा रामटेके, अर्चना लेंडे, वंदना मुळेवार, मोठया संख्येत भाजपाचे पदाधिकारी, महिला आघाडी व कार्यकर्ते उपस्थित होते.