प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ लातूरच्या वतीने पत्रकारांचा सत्कार

31

✒️लातूर(पुरोगामी न्यूज नेटवर्क)

लातूर(दि.12मार्च):-प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ लातूर जिल्ह्याच्या वतीने नुकताच पत्रकारांचा सत्कार करण्यात आला.
दिल्लीत पत्रकारांचा आदरयुक्त सन्मान केला जातो व प्रिंट मीडियामुळे सामान्याचे प्रश्न ऐरणीवर येतांना दिसतात. लातूर येथील प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाच्या जिल्हा कार्यालयात बहुजन मिडिया काऊन्सिल ऑफ नोयडा, नवी दिल्लीचे पत्रकार दिनेश कुमार व संघाचे नांदेड जिल्हाध्यक्ष संजिकुमार गायकवाड यांचा सत्कार करण्यात आला.

या प्रसंगी दिनेश कुमार म्हणाले की, पत्रकारिता टिकवायची असेल तर पत्रकारितेला धार दिली पाहिजे. प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाचे कार्य महाराष्ट्रात उत्कृष्ट कार्य सुरू आहे त्याचाच एक भाग म्हणजे लातूर जिल्हा पदाधिकारी असे संघाचे नांदेड जिल्हाध्यक्ष संजीवकुमार गायकवाड यांनी सांगितले.या कार्यक्रमासाठी लातूर जिल्हा अध्यक्ष लहूकुमार शिंदे, जिल्हा संघटक संजय राजुळे, उपाध्यक्ष महादेव पोलदासे, प्रसिद्धीप्रमुख संतोष सोनवणे, श्रीकांत चलवाड आदी पदाधिकारी उपस्थित होते.