नागपुरातील ….या हाॅस्पिटलमध्ये प्रॅक्टिस करणारे गडचिरोली जिल्हा सामान्य रुग्णालयातील आर्थोपेडीक सर्जन ?

29

🔸मंत्रालय आणि आरोग्य सचिवालयात तक्रार दाखल 

🔹माहिती अधिकारात पुर्ण सत्य माहिती मिळणार??

✒️मुंबई(पुरोगामी न्युज नेटवर्क)

गडचिरोली(दि.12मार्च):- जिल्हा सामान्य रुग्णालयात नियमित वेतनावर डॉ. सतीश मेश्राम आर्थोपेडीक सर्जन म्हणून काम करीत आहेत. परंतु मागिल आठवड्यात गडचिरोली जिल्हा सामान्य रुग्णालयातील आर्थोपेडीक सर्जन च्या बोगस प्रमाणपत्राचा प्रकार चांगलाच गाजला. या वृत्ताची गंभीरपणे दखल घेऊन मंत्रालय आणि आरोग्य सचिवालयात तक्रार दाखल करण्यात आली आहे. शेतकरी कामगार पक्षाचे देवेंद्र चिमणकर यांनी थेट मंत्रालय गाठुन मंत्रालयीन अधिकाऱ्यांना सदर बाब निदर्शनास आणून दिली असल्याचे विश्वसनीय वृत हाती आले आहे. गडचिरोली जिल्हा सामान्य रुग्णालयातील आर्थोपेडीक सर्जन हे नागपूर येथील प्रसिद्ध असलेल्या एका भव्य हाॅस्पिटलमध्ये प्रॅक्टिस करित असल्यामुळेच (फोटो मध्ये स्पष्ट नाव दिसत आहे.)

त्यांच्या नावाचा उल्लेख करण्यात आलेला आहे. कुठेही प्रॅक्टिस करित नसणारे डॉक्टर आपल्या नावाची नेमप्लेट लावणार तरी कसे❓. असा प्रश्न आरोग्य सचिवालयात उपस्थित केला जात आहे. तसेच जिल्हा सामान्य रुग्णालयात आणि गडचिरोली शहरात चर्चेचा विषय बनला आहे. या विषयावर शहरातील एका माफिया , पोटभरू पत्रकाराने काॅमेंट करून प्रकरणाला कलाटणी देण्याचा प्रयत्न केला मात्र मुंबई येथुन एका मिनिटांतच बोलकी बंद करण्यात आली.
या विषयाच्या अनुषंगाने माहिती अधिकारात दि. ११ मार्चला जिल्हा सामान्य रुग्णालयात २०१० ते १० मार्च २०२२ पर्यंत प्रमाणपत्र देण्यात आलेल्या अस्थिव्यंग अपंगत्वाच्या लाभार्थींची यादी मागितली आहे. माहिती अधिकार नियम २००५ अन्वये देण्यात आलेल्या पत्रामध्ये अपंगत्व असलेल्या व्यक्तिंचे नांव , पत्ता, मोबाईल क्रमांक, अस्थिव्यंग अपंगत्वाची टक्केवारी, प्रमाणपत्र सादर केल्याचा दिनांक, अस्थिव्यंग अपंगत्वाचे प्रमाणपत्र देणाऱ्या वैद्यकीय अधिकाऱ्याचे नाव इत्यादी आवश्यक बाबींचा समावेश असलेली माहिती मागविण्यात आलेली आहे. त्यामुळे आतापर्यंत अस्थिव्यंग असलेल्या बोगस प्रमाणपत्राचा शोध लागणार आहे. अनेकांनी बोगस प्रमाणपत्राचा आधार घेऊन शासकीय आणि निमशासकीय कार्यालयात नोकरी बळकावली आहे. अशा प्रकारच्या अस्थिव्यंग बोगस प्रमाणपत्रांमुळे खरे अपंगत्व असलेल्या उमेद्वारांवर फार मोठा अन्याय झालेला आहे. माहिती अधिकारात मागविण्यात आलेली माहिती किती प्रमाणात सत्य दिली जाते याकडे लक्ष वेधून घेतले आहे.

गडचिरोली जिल्हा सामान्य रुग्णालयात अस्थिव्यंग अपंगत्वाचे प्रमाणपत्र देण्यासाठी आवश्यक असलेल्या कामकाजाची श्रृंखला राबविण्याचे काम नेहमी सहाय्यक म्हणून ओळखले जाणारे रोहिदास कंकलवार करित असल्याची चर्चा जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या परिसरात ऐकावयास मिळत आहे. रोहिदास हे अस्थिव्यंग तज्ञ आणि सल्लागार म्हणून प्रसिद्ध असलेल्या डॉक्टर च्या समवेत राहात असल्याने त्यांच्या सहाय्याने बोगस अस्थिव्यंग अपंगत्वाचे प्रमाणपत्रांची खैरात झाली असावी?? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. ” अपंगत्वाचे बोगस प्रमाणपत्र” हा विषय आरोग्य सचिवालयात पोहचविण्यात आल्याने पूढे….. पूढे काय..❓ होते याकडे अनेकांचे लक्ष वेधले आहे. बोगस अस्थिव्यंग अपंगत्वाचे प्रमाणपत्राचा शोध घेण्यासाठी वरिष्ठ पातळीवरून प्राप्त होणाऱ्या मार्गदर्शन सुचनेनुसार जेएएफ ची चमू कार्यान्वित करण्यात आली असल्याचे गोपनिय सुत्रांनी सांगितले.