जनकापुर येथे जि.प.सदस्य संजय गजपुरे यांच्या हस्ते आठवडी बाजाराचा शुभारंभ

31

🔹उमेद ग्रामपंचायत जनकापुर व आधार महिला ग्रामसंघाचा पुढाकार

✒️जनकापूर(पुरोगामी न्यूज नेटवर्क)

जनकापूर(दि.12मार्च):-महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान, तालुका अभियान व्यवस्थापन कक्ष, पंचायत समिती नागभीड यांच्या मार्गदर्शनातून आधार महिला ग्रामसंघ, जनकापूर, भरारी प्रभाग संघ तळोधी-गोविंदपूर क्षेत्र व ग्रामपंचायत जनकापूर यांच्या संयुक्त विद्यमाने ११ मार्च शुक्रवारला आठवडी बाजाराचे उद्घाटन भाजपा जिल्हा महामंत्री व जि.प.सदस्य संजय गजपुरे यांच्या हस्ते करण्यात आले. या उद्घाटन सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी जनकापुरचे उपसरपंच महेश रामटेके हे होते .

उद्घाटन सोहळ्याचे वेळी गावातील १२ स्वयंसहायता समूहातील महिला व गावातील नागरिक उपस्थित होते. या आठवडी बाजाराच्या माध्यमातून उत्पादक, विक्रेते व ग्राहक यांना स्थानिक बाजारपेठ उपलब्ध झाल्याबाबत उपस्थित अतिथींनी आनंद व्यक्त केला.आठवडी बाजार सुरू करण्यामागचा उद्देश गावातील उत्पादीत मालाची गावात विक्री करता यावी.गावकऱ्यांचे वेळ व श्रम कमी व्हावे तसेच दळणवळणाचा खर्च कमी व्हावा हा आहे. उमेद च्या माध्यमातुन गावखेड्यातील महिलांची आर्थिक सक्षमतेकडे वाटचाल सुरु झाली असल्याचे प्रतिपादन याप्रसंगी संजय गजपुरे यांनी यावेळी केले.

या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून नागभीड पं.स. सदस्या सौ.रंजनाताई पेंदाम , जनकापुर च्या सरपंच सौ.वैशालीताई गायधने, आधार महिला ग्रामसंघ जनकापुर च्या अध्यक्षा सौ.शुभांगीताई सुर्यवंशी व सचिव सौ.सुरेखाताई काशिवार ,ग्रा.पं.सदस्या सौ.शारदाताई सुर्यवंशी व सौ.शुभांगीताई डहारे, उमेद चे नागभीड तालुका अभियान व्यवस्थापक मोहित नैताम , तालुका व्यवस्थापक अमोल मोडक , भरारी प्रभाग संघ तळोधी-गोविंदपूर क्षेत्रा च्या कोषाध्यक्षा सौ.सविताताई गेडाम ,जनकापुर चे ग्रामसेवक वासेकर , माविम च्या प्रेरिका सौ.सत्यवती रामटेके , उमेद चे प्रभाग समन्वयक कु. ज्योती साळवे व शुभम देशमुख यांची विशेष उपस्थिती होती .

कार्यक्रमाचे संचालन बचटगटाच्या वर्धिनी कु.देवता सुर्यवंशी व प्रास्ताविक पत्रकार राहुलजी रामटेके यांनी केले. तर उपस्थितांचे आभार आरोग्य व पोषण सखी सौ.प्रविणा रामटेके यांनी मानले .कार्यक्रमाच्या यशस्वितेकरिता गजानन गोहणे, दिपक गायकवाड, नंदकीशोर डहारे, इंद्रजीत टेकाम, किशोर मेश्राम, सौ.मालु रामटेके, सौ.दर्शना गुरनुले, प्रभागातील सर्व कृषी सखी,पशु सखी व समूह संसाधन व्यक्ती, गावातील सर्व कॅडर, ग्रामसंघ पदाधिकारी व ग्रामपंचायत पदाधिकारी यांनी मेहनत घेतली.