जिल्हाधिकारी कार्यालयासमोर प्रिंटिंग टेकनॉलॉजी कोर्स बचाव आंदोलन; विद्यार्थी क्षमता पूर्ववत ६० करा

31

🔸डॉ. गणेश ढवळे, मनोज जाधव आणि शार्दुल देशपांडे यांची मागणी

✒️नवनाथ आडे(जिल्हा प्रतिनिधी बीड)मो:-9075913114

बीड(दि.14मार्च):- प्रिंटिंग टेकनॉलॉजी ( मुद्रण तंत्र ) पदविका अभ्यासक्रम हा शासकीय तंत्रनिकेतन , बीड येथील १९९६ पासून सुरु आहे. सर्वात जास्त यशस्वी व रोजगाराची १००% हमी देणारा हा कोर्स आहे. सदर कोर्स हा महाराष्ट्रात फक्त मुंबई आणि बीड येथेच उपलब्ध आहे. सदर कोर्सची बीड येथील प्रवेश क्षमता ६० असताना काही “नाटाळ” मंडळींनी कुटील डाव आखत वरिष्ठांची दिशाभूल करून ही प्रवेश क्षमता ६० वरून ३० वर आणली असुन कमी केलेल्या प्रवेश क्षमतेचा दाखला देत हा कोर्स बंद किंवा स्थलांतरित करण्याचे कारस्थान पण होण्याची शक्यता नाकारता येत नाही .

तेव्हा या कोर्स ची प्रवेश क्षमता पूर्ववत ६० करण्यात यावी अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते तथा कार्याध्यक्ष भ्रष्टाचार निर्मूलन समिती महाराष्ट्र राज्य डॉ. गणेश ढवळे, शिक्षण हक्क आधिकार कार्यकर्ते मनोज जाधव, माहिती आधिकार कार्यकर्ते शार्दुल देशपांडे आदींनी जिल्हाधिकारी बीड यांच्यामार्फत मुख्यमंत्री, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत,प्रधान सचिव, विभागीय आयुक्त सुनिल केंद्रेकर यांच्या कडे मागणी करत जिल्हाधिकारी कार्यालयासमोर प्रिंटिंग टेक्नाॅलाजी कोर्स बचाव आंदोलन करण्यात येत असून आंदोलनात भ्रष्टाचार निर्मूलन समिती तालुकाध्यक्ष बीड शेख युनुस च-हाटकर , भ्रष्टाचार निर्मूलन समिती तालुकाध्यक्ष शिरूर अशोक कातखडे,उपाध्यक्ष ऑल इंडीया पॅथर सेना नितिन सोनावणे,डाॅ.संजय तांदळे, शेख, अजिज्जोदीन, शेख मुबीन,शिक्षण हक्क आधिकार कार्यकर्ते मनोज जाधव ,माहिती आधिकार कार्यकर्ते शार्दुल देशपांडे, राजेंद्र आमटे,सय्यद आबेद, आप जिल्हाध्यक्ष अशोक येडे,सचिव रामधन जमाले, आदि सहभागी होते निवेदन तहसिलदार( महसुल )जिल्हाधिकारी कार्यालय बीड बनकर यांना देण्यात आले.

सविस्तर माहीतीस्तव:-
____
ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करण्याचे धोरण ठेऊनच महाराष्ट्र शासनाने हा कोर्स बीड येथे सुरु केला होता. हा कोर्स सुरु झाल्यापासून आजतागायत बीड व आसपासच्या इतर जिल्ह्यातील असंख्य गोरगरीब, शेतकरी, ऊसतोड, मागासवर्गीय व अल्पसंख्यांक कुटुंबातील मुलांच्या नोकरीचा व पर्यायाने असंख्य कुटुंबांच्या उद्धाराचा स्रोत ठरला आहे . सदर कोर्सची प्रवेश क्षमता ६० असताना दरवर्षी ६० विद्यार्थ्यांचे नोकरीला रुजू होणे हे नक्की आहे.परंतु काही “नाटाळ” मंडळींनी कुटील डाव आखत वरिष्ठांची दिशाभूल करून ही प्रवेश क्षमता ६० वरून ३० वर आणलीअसुन,प्रवेश क्षमता कमी केल्यामुळे प्रथम वर्षातील ३० व थेट द्वितीय वर्षात प्रवेश घेणारे ग्रामीण भागातील गरजू विद्यार्थी रोजगाराच्या संधीपासून वंचित राहणार आहेत . तसेच कमी केलेल्या प्रवेश क्षमतेचा दाखला देत हा कोर्स बंद किंवा स्थलांतरित करण्याचे कारस्थान पण होण्याची शक्यता नाकारता येत नाही . तेव्हा हा कोर्स बीड मधून बंद करून इतर ठिकाणी स्थलांतरित करण्याचा जर शासनाचा मानस असेल तर बीड जिल्ह्यातील सर्व गोरगरीब, शेतकरी, ऊसतोड, मागासवर्गीय व अल्पसंख्यांक कुटुंबातील विद्यार्थी , सर्व राजकीय पक्ष , सामजिक संघटना लोकशाही मार्गाने विद्यार्थी रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करण्याचा ईशारा जिल्हाधिकारी बीड यांच्यामार्फत मुख्यमंत्री, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत, प्रधान सचिव, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य तथा पालकमंत्री बीड धनंजय मुंढे, विभागीय आयुक्त सुनिल केंद्रेकर यांना देण्यात येऊन व्यापक जनआंदोलनाचा ईशारा दिला आहे