लटके साहेब निधी तुमच्या वडिलांची मिळकत नाही.:-डॉ. राजन माकणीकर

28

✒️मुंबई(पुरोगामी न्युज नेटवर्क)

मुंबई(दि.14मार्च):- १९८४-८५ पासून आमदार निधीचा जन्म झाला, स्थानिक गरजांवर आधारित लहान लहान कामांचा विशेष कार्यक्रम’ अशी या निधी ची माण्यता आहे, तुम्ही स्थानिक जागी हा निधी ना वापरता दुसऱ्या मतदारसंघात निधी वापरण्याचे कारण काय? असा सवाल पँथर डॉ. राजन माकणीकर यांनी विचारला आहे.*

आदरणीय लटके साहेब आपण 166-अंधेरी (पूर्व) विधानसभा मतदारसंघातून शिवसेनेच्या तिकिटावर निवडून आलेले उमेदवार आहात, स्थानिक मतदारांनी आपले बहुमूल्य मतदान तुम्हाला देऊन निवडून आणलेले असतांना तूम्ही या मतदारसंघातील विकासकामांचा निधी आमदार रवींद्र वायकर यांच्या158 जोगेश्वरी पूर्व विधानसभा मतदारसंघात का वापरला? हा निधी जनतेचा आहे तुमच्या पप्पांची मिळकत नाही असा प्रश्नही यावेळी डॉ. माकणीकर यांनी केला.

पँथर माकणीकर पुढे म्हणाले की, तुम्ही विधानपरिषदेचे राज्यपाल नियुक्त आमदार नाहीत जे की राज्यात कोठेही निधी देऊ शकता, सामान्य माणसाला साधा उत्पन्नाचा दाखला काढण्यासाठी चारदा शपथपत्र द्यावे लागते. दुसरीकडे कोट्यवधीच्या निधीवर मात्र काहीच नियंत्रण नाही. आमदार निधी कशाप्रकारे खर्च करावा याबाबत राज्याने सप्टेंबर २०११ मध्ये काही मार्गदर्शक तत्वे जाहीर केली तिचा अभ्यास करा, तुमच्या मतदारसंघात किती विकासकामे अपूर्ण आहेत ती पहा.

यापुढे तुम्ही असा निधी नको त्या जागी वापरला तर माझ्याशी गाठ आहे, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया डेमोक्रॅटिक तुमचे मनसुबे उधळून लावेल, मतदारसंघात केवळ विकासकांच्या मागे न लागता अडकलेली विकासकामे पूर्ण करा अन्यथा कायम येळवन जुगाई मंगलमूर्ती बंगल्यावर जाऊन बसावे लागेल. असा इशारा पक्षाचे राष्ट्रीय महासचिव डॉ राजन माकणीकर यांनी दिला.