सुवर्ण महोत्सवी शाळेत दहावीच्या विद्यार्थ्यांना निरोप…

33

🔸चांगला अभ्यास करा व शाळेचे नाव उज्ज्वल करा – प्र.मुख्याध्यापक जे. एस. पवार

✒️धरणगाव प्रतिनिधी(पी.डी.पाटील सर)

धरणगांव(दि.14मार्च):- सुवर्णमहोत्सवी शाळा महात्मा फुले हायस्कूल धरणगाव येथे वर्ग दहावीच्या विद्यार्थ्यांना निरोप देण्यात आला. निरोप समारंभ कार्यक्रमाचे प्रास्ताविक दहावीचे वर्ग शिक्षक एस.व्ही. आढावे यांनी केले.निरोप समारंभाच्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेच्या ज्येष्ठ शिक्षिका पी.आर.सोनवणे होत्या. कार्यक्रमाचे अध्यक्षा, शाळेचे प्रभारी मुख्याध्यापक जे.एस.पवार, ज्येष्ठ शिक्षिका एम.के.कापडणे व सर्व शिक्षक बंधू-भगिनी यांच्या हस्ते राष्ट्रपिता महात्मा ज्योतिराव फुले व विद्येची खरी देवता सावित्रीमाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.

निरोप समारंभाच्या प्रसंगी वर्ग दहावीचे विद्यार्थी निलेश चौधरी, ईश्वर जगताप, समाधान महाजन, सारिका पाटील, रितू गायकवाड, रोहन गजरे, मनोज माळी यांनी आपल्या शाळेतील आठवणींना उजाळा दिला व शिक्षकांप्रती कृतज्ञता व्यक्त केली. आम्ही चांगले मार्क्स मिळवून शाळेचे नाव मोठे करू असे प्रतिपादन केले.शाळेचे ज्येष्ठ शिक्षक सी.एम.भोळे , एस.एन. कोळी. वर्ग दहावीचे वर्गशिक्षक पी.डी.पाटील, एस.व्ही.आढावे यांनी सर्व निरोप आरती विद्यार्थ्यांना एस.एस.सी बोर्ड परीक्षेच्या मार्गदर्शक सूचना दिल्या. पेपर कसा लिहावा ? याचे मार्गदर्शन करून येणार्‍या बोर्डाच्या परीक्षेसाठी शाळेचे मुख्याध्यापक व शिक्षक वृंद यांच्या वतीने मनःपूर्वक शुभेच्छा देण्यात आल्या.

वर्ग दहावीच्या विद्यार्थ्यांनी शाळेला कुळवाडी भूषण बहुजन प्रतिपालक छत्रपती शिवराय यांची प्रतिमा भेट दिली.अध्यक्षीय भाषणात पी.आर. सोनवणे यांनी मुलांना चांगला अभ्यास करा व चांगले मार्क्स मिळवुन शाळेचे नाव उज्ज्वल करा असे संबोधित करून परीक्षेसाठी शुभेच्छा दिल्या. सर्व दहावीच्या विद्यार्थ्यांना शाळेच्या वतीने अल्पोपहार देण्यात आला.निरोप समारंभ कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वर्ग दहावी चे वर्गशिक्षक पी.डी. पाटील यांनी तर आभार हेमंत माळी यांनी मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक बंधू-भगिनी कर्मचारी वृंद यांनी सहकार्य केले.