पालकमंत्री ना. धनंजय मुंडेंच्या माध्यमातून प्रश्न सोडविण्यासाठी कटिबद्ध; आशा वर्कर्स म्हणून काम करणाऱ्या भागिणींच्या पाठीशी भाऊ म्हणून मी कायम उभा आहे – अजय मुंडे

33

🔸लोकनेते स्व. गोपीनाथराव मुंडे नटराज रंग मंदिर येथे आशा वर्कर्स व कोरोना योद्धा सत्कार सोहळा संपन्न

✒️अतुल बडे(परळी प्रतिनिधी)

परळी(दि.12मार्च):-कोरोना काळात काम करणाऱ्या आशा फ्रंटलाईन वर्कर्स व त्यांच्यासोबत काम करणारे कर्मचारी यांचे कार्य खरोखरच उल्लेखनीय आहे. शहराबरोबर ग्रामीण भागातही या कोरोना काळात काम केलेली प्रत्येक व्यक्ती ही देवदूतच आहे, असे गौरवोद्गार या सत्कार सोहळ्यात कोरोना योद्ध्यांचा सन्मान करताना श्री अजय मुंडेंनी काढले.बीड जिल्ह्याचे पालकमंत्री ना. धनंजय मुंडे यांच्या माध्यमातून आशा फ्रन्टलाइन वर्कर्स यांच्या समस्याचे समाधान करण्यासाठी मी स्वतः कटीबद्ध आहेच पण या सर्व भगिनींचा भाऊ म्हणून मी कायम पाठीशी उभा आहे, असा विश्वासही यावेळी या सत्कार सोहळ्यात श्री मुंडेंनी व्यक्त केला.

परळी पंचायत समिती व तालुका आरोग्य अधिकारी कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने आज परळी येथील स्व. गोपीनाथराव मुंडे नटराज रंग मंदिर येथे आशा वर्कर्स व कोरोना योद्धा सत्कार सोहळा संपन्न झाला, या कार्यक्रमाचे उद्घाटन बीड जिल्हा परिषदेचे गटनेते अजयभाऊ मुंडे यांच्या हस्ते करण्यात आले तर अध्यक्षस्थानी परळी पंचायत समितीचे सभापती बालाजी उर्फ पिंटू मुंडे हे होते. यावेळी उपस्थित उपसभापती जनिमिया कुरेशी, उपजिल्हाधिकारी श्रीमती नम्रता चाटे, पं.स. सदस्य सुषमाताई मुंडे, कल्पनाताई सोळंके, मीनाताई तिडके, रेखाताई शिंदे, माऊली मुंडे, टोकवाडीच्या सरपंच गोदावरीताई मुंडे, तालुका गटविकास अधिकारी संजय केंद्रे, तालुका आरोग्य अधिकारी लक्ष्मण मोरे, श्री. मुंडे सर, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे शहर उपाध्यक्ष ज्ञानेश्वर तात्या होळंबे, भागवत गित्ते व आशा वर्कर्स भगिनी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.