जिल्ह्यातील बेरोजगार भुमिपुत्रांच्या हाताला काम द्या : रुपेश निमसरकार

36

🔸भुमिपुत्रांच्या बेमुदत उपोषणाला पँथर सेनेचा पाठिंबा

🔹जिल्ह्याधिकाऱ्यांना दिले निवेदन

✒️रोशन मदनकर(उप संपादक)

चंद्रपूर(दि.14मार्च):-जिल्ह्यात अनेक उद्योग असून औद्योगिक जिल्हा म्हणून महाराष्ट्रात नाव आहे. मात्र या उद्योग कंपन्यात स्थानिक बेरोजगारांना डावलून परप्रांतीयांना महत्त्व देऊन नौकरीत त्यांचीच नियुक्ती केली जाते. जिल्हा आमचा,जिल्ह्यातील जमीन आमची, कंपनीचे प्रदुषण आम्ही झेल्यायचे, आयुष्य आमचं कमी करायचे मात्र रोजगार परप्रांतीयांना हे कंपनीचं धोरण झालयं. या कंपन्यांच्या मुजोर धोरणाविरोधात भुमिपुत्रांच्या न्याय मागण्यांना घेऊन कामगार नेते मनदीप रोडे आंदोलन करीत आहेत. या कामगारांच्या मागण्या तात्काळ पुर्ण व्हाव्या यासाठी ऑल इंडिया पँथर सेनेनं चालू असलेल्या आंदोलनाला जाहीर पांठिबा दिला असून मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकारी यांना दिले आहे.

गेल्या हप्ताभरापासून सुरु असलेल्या आंदोलनाची अजूनपर्यंत जिल्हा प्रशासनाने दखल घेतली नाही, ही बाब सुद्धा निंदनीय आहे. त्यामुळे ऑल इंडिया पँथर सेनेच्या वतीने जिल्हाधिकारी यांना भेटून भुमिपुत्रांच्या अडचणी सांगितल्या असता याची दखल घेऊन जिल्हा प्रशासनातील सिएफ यांना उद्या उपोषण स्थळी पाठवून समस्या जाणून घेऊ व लवकरात लवकर प्रश्न मार्गी लावू असे सांगण्यात आले.निवेदन देतांना ऑल इंडिया पँथर सेनेचे जिल्हाध्यक्ष रुपेश निमसरकार, जिल्हा उपाध्यक्ष त्यागीभाई देठेकर, जिल्हा युवा अध्यक्ष अजय झलके, जिल्हा सल्लागार सुरेश नारनवरे, धधपाल राहुलगडे, जिल्हा शहर अध्यक्ष सुमीत कांबळे आदी पँथर उपस्थित होते.