हज़रत मौलाना मुहम्मद उमरैन महफुज रहमानी परळीत

31

✒️अतुल बडे(परळी प्रतिनिधी)

परळी(दि.१७ मार्च):-२०२२ रोजी हज़रत मौलाना मुहम्मद उमरैन महफुज रहमानी परळीत एका धार्मिक “इसलाह-ए-मुआशरा” च्या कार्यक्रमात आज दि. १७ मार्च गुरुवारी संध्याकाळी ०७ वाजता डॉ जाकेर हुसैन चौक ( बरकत नगर चौक) येथे कार्यक्रम होणार आहे.

या कार्यक्रमात मदरसा अल-जामिया राशिदा लिबिनातुल मुस्लिमीन च्या चार विद्यार्थ्यांनी ‘आलेम’ हि धार्मिक पदवी पुर्ण केलेल्या सनद (पदवी ) वितरण सोहळा इस्लामिक नामवंत धर्मगुरू हज़रत मौलाना हज़रत मौलाना मुहम्मद उमरैन महफुज रहमानी ( सेक्रेटरी ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्ड ) यांच्या हस्ते सन्मानित करण्यात येणार आहे या कार्यक्रमात प्रमुख उपस्थिती म्हणून मुस्लीम पर्सनल लॉ बोर्ड चे मेंबर मौलाना जुनेद आझाद , मुफ्ती अश्फाक खासमी साहेब व मुफ्ती शफिक मिल्ली रहमानी ( बीड जिल्हा अध्यक्ष जमियात उलमा-ए- हिंद) आणि जनाब मोहम्मद इरफान साहब (डायरेक्टर इक्रा एज्युकेशन बेंगलुरु) या सर्वांचे परळीत आगमन निमित्ताने धार्मिक अभ्यासक अशा विचारांचा लाभ घ्यावा असे आवाहन मौलाना शेख तैयमुर मिल्ली सहाब यांनी केले आहे.