मोहदरी वंचित बहुजन आघाडीची शाखा कार्यकारिणी व बुथ बांधणीचे गठण

31

✒️सिध्दार्थ दिवेकर(जिल्हा प्रतिनिधी,यवतमाळ)मो:-9823995466

उमरखेड(दि.17मार्च):-मौजे मोहदरी येथे उमरखेड तालुकाध्यक्ष संतोष जोगदंडे यांच्या नेतृत्वात दि.16/03/2022 रोजी वंचित बहुजन आघाडी च्या ग्रामसभा कार्यकारिणी व बुथ बांधणी चे गठण करण्यात आले.

त्याप्रसंगी प्रमुख मार्गदर्शक मार्शल विनोद बरडे सर, प्रमुख उपस्थिती मध्ये पंकज भाऊ गायकवाड, राजू भाऊ दाभाडे सर, गौतम कांबळे, राहुल धुळधुळे हे होते.तर ग्रामशाखा अध्यक्षपदी मयुरदादा धुळे,, महिला अध्यक्षापदी सुमनबाई दिपक कांबळे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.बहुसंख्य नागरिकांच्या उपस्थितीत ग्राम शाखा बांधणी व बुथ बांधणी करण्यात आली.