चंद्रपूरातील दीक्षाभूमी परिसरातील भारतरत्‍न डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवनात वॉटर कुलर, ए.सी. सोलार सिस्‍टीम तथा साऊंड सिस्‍टीमसाठी निधी उपलब्‍ध करण्‍याची आ. सुधीर मुनगंटीवार यांची मागणी

27

✒️पंकज रामटेके(घुग्घुस प्रतिनिधी)

🔹शासनाला प्रस्‍ताव प्राप्‍त होताच निधीच्‍या उपलब्‍धतेबाबत कार्यवाही करू – सामाजिक न्‍यायमंत्री धनंजय मुंडे यांचे तारांकित प्रश्‍नाला उत्‍तर

चंद्रपूर(दि.17मार्च):-चंद्रपूरातील ऐतिहासिक पवित्र दीक्षाभूमी येथील भारतरत्‍न महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवन येथे वॉटर कुलर, ए.सी. सोलार सिस्‍टीम तथा साऊंड सिस्‍टीमसाठी ५० लाखाचा निधी उपलब्‍ध करून देण्‍याची मागणी विधानसभा सदस्‍य बल्‍लारपूर यांनी केली आहे. सदर कामाचे अंदाजपत्रक तयार करून सविस्‍तर प्रस्‍ताव सादर करण्‍याबाबत क्षेत्रीय अधिका-यांना कळविले आहे. प्रस्‍ताव शासनाला प्राप्‍त होताच निधीच्‍या उपलब्‍धतेबाबत कार्यवाही करण्‍यात येईल, असे आश्‍वासन सामाजिक न्‍यायमंत्री धनंजय मुंडे यांनी दिले.

दिनांक १४ मार्च रोजी आ. सुधीर मुनगंटीवार यांनी उपस्थित केलेल्‍या विधानसभा तारांकित प्रश्‍नाच्‍या लेखी उत्‍तरात त्‍यांनी वरील माहिती दिली. दीक्षाभूमी परिसरातील भारतरत्‍न डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवनाचे बांधकाम पूर्ण झाले असून याठिकाणी वॉटर कुलर, ए.सी. सोलार सिस्‍टीम तथा साऊंड सिस्‍टीमची आवश्‍यकता असून यासाठी तातडीने निधी उपलब्‍ध होण्‍याची गरज त्‍यांनी मुळ प्रश्‍नाच्‍या माध्‍यमातुन प्रतिपादीत केली. यासंदर्भात आपण सामाजिक न्‍यायमंत्र्यांना १२ स्‍मरणपत्रे पाठविली असल्‍याचे त्‍यांनी प्रश्‍नात म्‍हटले आहे