21 मार्च रोजी महाराष्ट्र राज्य ग्रंथालय संघाचे वतीने एक दिवसीय धरणे आंदोलन

35

✒️रोशन मदनकर(उप संपादक)

नागपूर(दि.17मार्च):- महाराष्ट्र राज्य ग्रंथालय संघाचे वतीने एक दिवसीय धरणे आंदोलन आझाद मैदान ,मुंबई येथेदिनांक २१ मार्च २०२२ रोजी सकाळी ९ ते ४ वाजता आयोजित केले आहे.ग्रंथ सेवक, कर्मचारी, पदाधिकारी, कार्यकर्ता यांची एकजूट दाखवून आपल्या विविध मागण्या शासन दरबारी मांडण्यात येणार आहेत नागपूर विभागातील सर्व शासनमान्य सार्वजनिक ग्रंथालयातील कार्यकर्ते व पदाधिकारी, ग्रंथालय कर्मचारी , सेवक यांनी धरणे आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

महाराष्ट्र राज्य ग्रंथालय संघाचे अध्यक्ष डॉ. गजानन कोटेवार यांच्या नेतृत्वात राज्य शासनास सातत्याने निवेदने, समक्ष मंत्र्यांना भेटून व विनंती करूणही, ग्रंथालयाचे प्रश्न सुटत नाही, ग्रंथालयीन कर्मचाऱ्यांकडे दुर्लक्ष होत आहे, आत्महत्यांचे प्रमाण वाढते आहे,अनपढ राज्यकर्त्याना ग्रंथालयाचे महत्व उमगले नाही, असे मत नागपूर विभाग ग्रंथालय संघ नागपूरचे प्रमुख कार्यवाह भाऊराव पत्रे यांनी व्यक्त केले आहे.