भिवापूर नगर परिषद कामगार सभा संपन्न

91

✒️रोशन मदनकर(उप संपादक)

नागपूर(दि.18मार्च):-रोजंदारीवर कायम काम करणाऱ्या महिला व कंत्राटी कामगार यांच्या समस्या सोडवण्यासाठी सनदशीर मार्गाने पत्रव्यवहार करून न्याय मिळवून देण्यासाठी युनियन संघर्ष करेल असे स्वतंत्र मजदूर युनियनचे राज्य संघटक गणेश उके यांनी सांगीतले.स्वतंत्र म्युनिसिपल कामगार युनियन भिवापूर नगर परिषद शाखाच्या वतीने आयोजित सभेत ते बोलत होते.

स्वतंत्र मजदूर युनियनचे राष्ट्रीय उपाध्यक्ष विकास गौर,वाडी नगर परिषद शाखाचे सचिव धनंजय कलसे आणि भिवापूर नगरपरिषदच्या कामगार कर्मचारी यांच्या प्रमुख उपस्थितीत भिवापूर नगर परिषद शाखेची सभा संपन्न झाली. मागितल्याने मिळत नाही आणि संघर्षा शिवाय पर्याय नाही, त्यासाठी सर्व कंत्राटी कामगारांनी संघटित झाले पाहिजे असे गणेश उके यांनी आवाहन केले.भिवापूर नगर परिषद शाखा कमिटी लवकरच गठीत करण्यात यावी असे सर्वानुमते ठरविण्यात आले.त्यावेळी रवि रडके, सुनिता रामवंशी, उषा सेनापती, सुशील रामवंशी, महावीर कलसे, प्रकाश रामवंशी, गणेश रामवंशी आदी भिवापूर नगरपरिषद चे कामगार कर्मचारी सभे करिता उपस्थित होते.।