रेल्वे कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी सेंट्रल रेल्वे मजदूर संघटनेतर्फे मोर्चाचे आयोजन करण्यात आले

34

✒️संदिप सोनवणे(विशेष प्रतिनिधी येवला)मो:-९६०४१६२७४०

🔸मागण्या मान्य न झाल्यास तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल असा इशारा देण्यात आला

मनमाड(दि.18मार्च):- रेल्वे कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी सेंट्रल रेल्वे मजदूर संघटनेतर्फे येथील सहाय्यक मंडळ अभियंता कार्यालयवर रेल पथ कार्यालय ते सहाय्यक मंडल अभियंता कार्यालयापर्यंत विशाल मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी विविध मागण्यांचे निवेदन सहाय्यक मंडल अभियंता विशाल डोळस यांना निवेदन देण्यात आले. मागण्या मान्य न झाल्यास तीव्र आंदोलन केले जाईल असा इशारा याप्रसंगी देण्यात आला.

             या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन महेंद्र चोथमल यांनी केले.याप्रसंगी कामगारांना संबोधले गणेश हाडपे, शशिकांत आडोळकर,चेअरमन प्रकाश बोडखे, सेक्रेटरी इरफान शेख,ओपन लाईन चेअमन आनंद गांगुर्डे,सेक्रेटरी नितीन पवार यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी ज्या ज्या लोकांनी सहकार्य केले व उपस्थिती दाखवली त्यांचे आभार प्रदर्शन सेक्रेटरी नितीन पवार यांनी केले. ह्या मोर्चा प्रसंगी मोठ्या संख्येने सेंट्रल रेल्वे मजदूर संघ कारखाना शाखा व सेंट्रल रेल्वे मजदूर संघ ओपन लाईन शाखाच्या विद्यमानाने या मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी सर्व पदाधिकारी व कामगार मोठ्या संख्येने उपस्थित होते.

*कामगारांच्या या मागण्यांसाठी धरणा मोर्चाचे आयोजन ….*.
१) बे नंबर २ शेडची रीपेरिग करणे 
२) वर्कशॉप मधील सर्व शेडचे लिकेज संबंधित 
३) संडास बाथरूम मधील टाक्यांची चोकअप काढणे कमी करणे व पाण्याची पूर्तता संबंध मे
४) सायकल स्टँड चे लिकेज रिपेरिंग करणे हेतू
५) रेल्वे कॉलनी मध्ये नियमित पाणीपुरवठा संबंधित
६) रेल्वे कॉलनी मधील तुटलेले दरवाजे सेफ्टी टँक चेकअप आणि ड्रेनेज लाईन रिपेरिंग भिंतीवरील स्टाईल रिपेरिंग
७) चात्रवास च्या बाजूच्या रेल्वे कॉटर ची रिपेरिंग तथा ओपन लाईन विभागातील कर्मचाऱ्यांना येणाऱ्या समस्यांचे समाधान