तीन दिवसीय ग्रामपंचायत सदस्यांचे क्षमता बांधणी प्रशिक्षण शिबीर संपन्न

34

✒️बाळासाहेब ढोले(पुसद प्रतिनिधी)

पुसद(दि.23मार्च):-येथील बाबासाहेब नाईक अभियांत्रिकी महाविद्यालय सभाग्रह पुसद येथे दि. 21मार्च ते 23 मार्च रोजी ग्रामपंचायत सदस्यांचे राष्ट्रीय ग्रामस्वराज्य अभियान अंतर्गत तीन दिवसीय क्षमता बांधणी प्रशिक्षण घेण्यात आले.प्रशिक्षणाचे उद्घाटन प्राचार्य अश्विन आडे व प्रा.शरद वानखेडे यांच्या हस्ते करण्यात आले.सदर प्रशिक्षणामध्ये वेगवेगळ्या विषयावर मार्गदर्शन करण्यात आले.

यामध्ये शरद वानखेडे यांनी पंचायत राज व्यवस्था व ७३ वी घटना दुरुस्ती या बाबत माहिती दिली. पंजाब चव्हाण यांनी ग्रामसभा व मासिक सभा रेकॉर्ड व १ ते ३३ नमुने, रामदास पाटमासे यांनी ग्रामपंचायत कायद्याच्या कलमांची माहिती दिली. सुदाम पवार यांनी ग्रामपंचायत सरपंच सदस्यांचे अधिकार कर्तव्य व जबाबदारी बाबत माहिती दिली.मदन गेडाम सरांनी लोकसहभागातून ग्रामविकास कसा करायचा या विषयी मार्गदर्शन केले. सुभाष पवार यांनी गाव निहाय समिती, वसंत चव्हाण यांनी जलसंधारण बाबत सभा, प्रभाकर धावडे यांनी ग्रामपंचायतीची

माहिती दिली. शेवटच्या दिवशी संतोष डाखोरे यांनी १४ वा वित्त आयोग व.गाव निहाय आराखडा तसेच विस्तार अधिकारी आरोग्य राठोड यांनी कोरोना आजार, लक्षणे व उपाय तसेच ग्रामपंचायतीची जबाबदारी याबाबत मार्गदर्शन केले.या क्षमता बांधणी शिबिरामध्ये पुसद व उमयखेड तालुक्यातील ग्रामपंचायतीच्या सदस्यांनी भाग घेतला होता.आपल्या मनोगतामध्ये प्रशिक्षणाबाबत उपस्थित सर्व सदस्यांनी समाधान व्यक्त केले व सर्व व्याख्यात्यांचे आभार मानले.