खरपुंडी येथे रासेयोचे आरोग्य तपासणी आणि रोग निदान शिबिर

36

✒️रोशन मदनकर(उप संपादक)

गडचिरोली(दि.23मार्च):- शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था गडचिरोली च्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे विशेष श्रमसंस्कार शिबिर खरपुंडी येथे सुरु आहे. या शिबिरात महिलांची आरोग्य तपासणी आणि रोग निदान शिबिर घेण्यात आले होते. गावातील हनुमान मंदिर परिसरात आयोजित शिबिरात डॉ. मृणालिनी भास्कर मेश्राम यांनी १२३ रूग्णांची तपासणी केली आणि औषधोपचार केले. यावेळी खरपुंडी आरोग्य सेविका कु. कल्पना रंगारी, आरोग्य सेवक जयंत सोनुले यांनी सेवा दिली.

अतिथी म्हणून सरपंच सौ.‌ ज्योत्स्ना म्हशाखेत्री, ग्रामपंचायत सदस्य बाळुभाऊ मेश्राम, प्रतिभा बारशिंगे,वामन टिकले, किरण ताई नैताम, ग्रामसेवक संजिव बोरकर, कार्यक्रम अधिकारी भास्कर मेश्राम, संतोष बोंद्रे, बंडोपंत बोढेकर , दिनेश आकरे उपस्थित होते.महिलांनी आपल्या आरोग्याची नियमित तपासणी केली पाहिजे तसेच आहाराकडे विशेष लक्ष दिले पाहिजे,असे आवाहन डॉ. मृणालिनी भास्कर मेश्राम यांनी केले.सायंकाळच्या सत्रात सर्पमित्र प्रा. विलास पारखी यांचे मार्गदर्शन लाभले. त्यात त्यांनी सापाविषयी समाजात असलेले समज गैरसमज यावर विस्तृत माहिती दिली. सूत्रसंचालन अक्षय कुर्जेकर यांनी केले तर आभार कृष्णा चरडुके यांनी केले.