विठ्ठल जाधव अ.भा. मराठी साहित्य संमेलनासाठी निमंत्रित

26

🔸बाल साहित्य मेळाव्यात कथाकथन

✒️नवनाथ आडे(बीड प्रतिनिधी)

बीड(दि.23मार्च):-उदगीर येथे दि.२२ ते २४ एप्रिल दरम्यान संपन्न होत असलेल्या ९५व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात प्रसिद्ध बालसाहित्यिक विठ्ठल जाधव यांना निमंत्रित करण्यात आले आहे. बालमेळाव्यात ते मुलांसाठी कथाकथन करणार आहेत.उदगीर जि. लातूर येथे संपन्न होत असलेल्या ९५ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात बालकांसाठी कथाकथन, काव्यवाचन , भरगच्च कार्यक्रम होत असून कोळवाडी ता. शिरूरकासार येथील प्रसिद्ध बालसाहित्यिक विठ्ठल जाधव यांना साहित्य संमेलनात निमंत्रितांचे कथाकथनात निमंत्रित करण्यात आले आहे.

विठ्ठल जाधव यांची ‘तिवढा’ ( ग्रामीण कथासंग्रह), ‘पांढरा कावळा’ (कादंबरी), ‘गर्भकळा’ (कवितासंग्रह), ‘बटाटीची धार’ (कथासंग्रह) ‘उंदरीन सुंदरीन’ (बालकविता ), मानवता व्हाऊचर (लेखसंग्रह) आदी ग्रंथसंपदा प्रकाशित आहे. ‘पांढरा कावळा’ या कादंबरीने त्यांची ओळख निर्माण केली. ग्रामीण भागात शैक्षणिक, साहित्य आणि वाचन चळवळीत महत्वाचे योगदान दिले असून महाराष्ट्र शासनाच्या राज्य वाङ्मयनिर्मिती पुरस्कारांसह अनेक नामांकित पुरस्कारही साहित्यकृतीस लाभले आहेत. निमंत्रित कथाकार म्हणून अखिल भारतीय साहित्य महामंडळाचे निमंत्रण मिळाले आहे.