आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबांना धनादेशाचे वाटप

60

✒️अमोल उत्तम जोगदंडे(उमरखेड प्रतिनिधी)

उमरखेड(दि.28मार्च):-महाराष्ट्राला गेली २५ वर्ष शेतकऱ्यांच्या आत्महत्या हा प्रश्न भेडसावतो आहे. सुरुवातीपासून आजपर्यंत रोजच्या बातम्यांपासून विधी मंडळाच्या अधिवेशनापर्यंत, रोजच्या राजकारणापासून ते निवडणुकांच्या राजकारणापर्यंत हा विषय धगधगता राहिला. पण आजही आत्महत्या होत आहेत… या गंभीर समस्येची ‘जाणारा जातो पण मागे जे राहतात त्यांचं काय?’ ही बाजूही तितकीच भीषण आहे. यवतमाळ जिल्ह्यात याची प्रचीती येत आहे यवतमाळ जिल्ह्यातील उमरखेड तालुका आत्महत्याग्रस्त तालुका म्हणून ओळखला जातो कधी कोरडा दुष्काळ तर कधी ओला दुष्काळ आणि उमरखेड तालुक्यामध्ये 2021 मध्ये नापिकी कर्जबाजारीपणामुळे सात शेतकऱ्यांनी आत्महत्या केली होती.

शेतकऱ्यांच्या आर्थिक मदत म्हणून महसूल प्रशासनामार्फत आज दिनांक 26 मार्च रोजी तहसील कार्यालय उमरखेड येथे उमरखेड तहसील चे कर्तव्यदक्ष तहसीलदार आनंद देऊळगावकर यांच्या हस्ते आत्महत्याग्रस्त कुटुंबातील वारसांना आज धनादेश वाटप करण्यात आले मालताबाई कांबळे मोहदरी, प्रयागबाई रणमले कोर्टा, ललिता प्रेम जाधव निंगणुर, सीताबाई प्रकाश चव्हाण ईसापुर, तृप्ती पुरी पोफाळी, प्रगती बिटेवार ब्राह्मणगाव,या शेतकऱ्यांना धनादेशाचे वाटप करण्यात आले उमरखेड तहसील चे कर्तव्यदक्ष तहसीलदार श्री आनंद देऊळगावकर यांनी आत्महत्याग्रस्त कुटुंबातील महिलांना मार्गदर्शन केले की खचून न जाता निराश न होता खंबीरपणे उभे रहा आणि कुठलीही अडचण आली तर मला कधीही संपर्क करा तुमच्या कुठल्याही तक्रारी असेल त्यासाठी मी व महसूल प्रशासन सदैव तत्पर राहील असे त्यांनी आत्महत्याग्रस्त कुटुंबातील सदस्यांना मार्गदर्शन केले यावेळी उमरखेड चे उपअधीक्षक भुमी अभिलेख मस्के साहेब उमरखेड तहसील चे तिडके साहेब तलाठी जी.एस.मोळके व सर्व कर्मचारी हजर होते.