ऍड.बेला विनोदकुमार टीबडेवाल राष्ट्रभाषा कोविद व आचार्य पुरस्काराने सन्मानित

28

✒️सुनील शिरपुरे(झरीजामणी प्रतिनिधी)

झरीजमनी(दि.28मार्च):-आंतरराष्ट्रीय हिंदी विश्व विद्यापीठाचे कुलगुरू डॉ रजनिशकुमार शुक्ल यांच्या हस्ते ऍड. बेला विनोदकुमार टीबडेवाल यांना राष्ट्रभाषा कोविद व आचार्य पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. राष्ट्रभाषा प्रचार समितीने आयोजित केलेल्या ३३ व्या दीक्षांत रामारंभात हा पुरस्कार सोहळा पार पडला. या प्रसंगी बेला विनोदकुमार टीबडेवाल यांना एकूण आठ पुरस्कार भारतातील वेगवेगळ्या राज्यातून मिळाले असून संपूर्ण भारतातून त्या प्रथम आल्या आहेत.

बेला टीबडेवाल यांना प्रदान करण्यात आलेल्या पुरस्कारांमध्ये माटुंगा राष्ट्रभाषा समिती स्व वासुदेव राव महादेव यांच्या स्मृति प्रीत्यर्थ, आसाम मधून स्व जितेंद्र चौधरी, मध्यप्रदेश मधून स्व. बैजनाथ प्रदास दुबे, स्व सूरज प्रसाद मेहरा, विदर्भ राष्ट्र भाषा प्रचार समिती कडून स्व. ऋषिकेश शर्मा यांच्या स्मृती प्रित्यर्थ, स्व शशिकांत पाट नी, स्व द्वारकदास वेद यांच्या स्मृति प्रीत्यर्थ, स्मृती चिन्ह, प्रमाणपत्र व पुरस्कार राशी देऊन सन्मानित करण्यात आले. या प्रसंगी मंचावर राष्ट्रभाषा प्रचार समितीचे प्रधानमंत्री डॉ हेमचंद्र वैद्य, डॉ कृष्णकुमार चौबे, महेश अग्रवाल, प्रकाश बाभळे व जगदीश पोद्दार मंचावर उपस्थित होते.