म्हैस चोरी प्रकरणातील तीन चोरटे सिरसाळा पोलीसांनी पकडलले

40

✒️अतुल बडे(सिरसाळा प्रतिनिधी)

सिरसाळा(दि.30मार्च):-गेल्या दोन महिन्यापूर्वी सिरसाळा पोलिस स्टेशन हद्दीतील कौडगांव साबळा येथे गोठ्यात बांधलेली म्हैस अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची तक्रार सिरसाळा पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आली होती त्या अनुषंगाने पोलीसांनी तपासाचे चक्रे वेगाने फिरवून गुप्त बातमीदार दार मार्फत आरोपीचा शोध लावून परभणी जिल्ह्यातील सोनपेठ व बीड जिल्ह्यातील वडवणी पिंपळा येथून करण साधू गवारे, बालाजी बाबुराव आव्हाड, सतिश बर्वे अश्या तीन आरोपींना ताब्यात घेऊन चौकशी केली असता म्हैस चोरी केल्याची कबूली दिल्याने अटक केली आहे.

मौजे कौडगांव साबळा येथून दिनांक 15/01/2022 वाजता संध्याकाळी 6 वाजता म्हैस आखाड्यात गोठ्यात बांधून फिर्यादी घरी गावात जावून झोपला असता सकाळी 4 वाजता वैरण टाकण्यासाठी आखाड्यात गेला असता म्हैस दिसुन अली नसल्याने फिर्यादीने सिरसाळा पोलिस स्टेशन गाठून फिर्याद दाखल केली होती त्या मध्ये काळ्या रंगाची गोल शिंगाची बुटकी गाबनी 60000 हजार किंमतीची म्हैस कोणीतरी अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची तक्रार दाखल करून कलम 379 नुसार गून्हा दाखल करण्यात आला होता या प्रकरणातील आरोपीचा शोध लावण्यास पोलीसांनी कंबर कसली होती गुप्त बातमीदार मार्फत पोलिसांना महिती भेटली असता त्यांनी सोनपेठ व पिपळा वडवणी येथून एकुण तीन आरोपींना पकडुन खाकीचा दणका दिला असता पोपटा सारखे बोलून त्यांनी सांगीतले की दिनांक 16/1/2022 रोजी रात्री दीड वाजता आम्ही रामराव कराड यांच्या शेतातील दावणीला बांधले ली म्हैस काही अंतरावर पायाने चालून आरोपींनी आणलेली पिक अप क्रमांक mh 44 -9322 या मध्ये नेवून सोलापूर जिल्ह्यातील बाजारात विकली असल्याचे कबूल केले असल्याने आरोपींना अटक करुन न्याल्याय हजर करुन काराग्रहात पाठवले आहे.

या प्रकरणाचा तपास सिरसाळा पोलिस स्टेशनचे सहायक पोलिस निरीक्षक प्रदीप एकशिंगे, पीएसआय प्रकाश शेळके, यांच्या मार्गदर्शनाखाली संतोष जेतेवाड यांनी केला दरम्यान सिरसाळा पोलिस स्टेशनचे ठाणेदार सहायक पोलिस निरीक्षक प्रदीप एकशिंगे यांनी पदभार घेतल्यापासून गुन्हा घडलेल्या घटनेत एकही प्रकरण प्रलंबित नसुन सर्व आरोपींना अवघ्या काही दिवसातच अटक करुन तपास करत असल्याने नागरिकांमध्ये एकशिंगे यांच्या कामगिरी बद्दल कौतुक केले जात आहे