आम्ही आंदोलनजीवी आहोत, पेन्शन साठी लढत राहू – सतिश डांगे

34

✒️रोशन मदनकर(उप संपादक)

ब्रम्हपुरी(दि.30 मार्च):-राजस्थान सरकारने व छत्तीसगड सरकारने जुनी पेन्शन योजना लागू करून तिथल्या कर्मचाऱ्याला न्याय दिलेला आहे. महाराष्ट्रात हे होऊ शकते.त्यासाठी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष नानाभाऊ पटोले यानी शर्थीचे प्रयत्न केले सुद्धा. मात्र अजित पवार नावाच्या एका मंत्र्याने या मागणीला छेद दिला. आणि जुनी पेन्शन चा विषय महाराष्ट्रात बारगळला.पण कर्मचाऱ्याच्या आपल्या मागणीसाठी असलेला जोश अजूनही तसाच आहे.लढाई सुरू राहीलच कारण आमच्या सारखे “आंदोलनजिवी” अजुन जिवंत आहेत.आणि जोपर्यंत आमच्या रक्तात अग्नी पेटत आहे, तोपर्यंत हा लढा सुरू राहील. असे प्रतिपादन महा.राज्य जुनी पेन्शन संघटना ब्रम्हपुरी चे तालुकाध्यक्ष तथा सामाजिक कार्यकर्ता ब्रम्हपुरी चे सतिश हरिदास डांगे यांनी केले.

न्यायाच्या प्रतीक्षेत असलेल्या ,2005 नंतर नोकरीवर लागलेल्या व मृत पावलेल्या अनेक कर्मचारी छत्तीसगडमधील व राजस्थान मधील सरकारचे मनोबल/ धैर्य उंचावण्यासाठी व इथल्या सरकारांनी आपल्या जाहीरनाम्यात जुनी पेन्शन चा मुद्दा घ्यावा यासाठी पेन्शन लागू केलेल्या दोन्ही राज्याच्या मुख्यमंत्र्यांचं अभिनंदनाचा बॅनर ख्रिस्तानंद चौक व शिवाजी चौक ब्रम्हपुरी येथे लावन्यात आला.यानिमत्ताने जिल्हा परिषद सदस्य मां.डॉ. रजेशजी कांबळे साहेब, त्याचबरोबर नगर परिषद बांधकाम सभापती विलास विखार हे उपस्थित होते.त्यांना राजस्थान चे काँग्रेस शासित राज्याचे मुख्यमंत्री व छत्तीसगड चे काँग्रेस शासित राज्याचे मुख्यमंत्री यांना अभिनंदनाचे पत्र ब्रम्हपुरी तालुका कार्यकारणी च्या वतीने देण्यात आला.

यावेळी मार्गदर्शन करताना डॉ.राजेश कांबळे साहेबांनी लवकरच जुनी पेन्शन चां हा मुद्दा येणाऱ्या निवडणुकीच्या जाहीरनाम्यात अग्रस्थानी असेल यासाठी प्रयत्न करू व त्यासाठी मंत्री विजय वडेट्टीवार यांना गांभीर्याने दखल घेण्यास भाग पाडू असे आश्वासन दिले. यावेळी उपस्थित शिलेदारांनी “जो पेन्शन की बात करेगा , वही देश पे राज करेगा l हा नारा दिला…या अभिनदन व आभार कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दीपक सेमस्कर यांनी केले. आभार प्रदर्शन करताना मयत कर्मचाऱ्यांच्या कुटुंबाची करुण कहाणी स्पष्ट करून तालुका सचिव प्रशांत घुटके यांनी यानिमित्ताने उपस्थितांचे आभार मानले. यावेळी तालुका कोषाध्यक्ष अनंत ढोरे,नरेश चौधरी,मनीष वैरागडे,नरेश चौधरी, ग्रामसेवक संघटना चे अध्यक्ष सपाटे सर, शिक्षक भारती चे तालुकाध्यक्ष राजेश धोंगडे आदी पदाधिकारी उपस्थित होते.