दिल्लीचे मुख्यमंत्री व आपचे संस्थापक अध्यक्ष मा. अरविंद जी केजरीवाल यांच्यावर झालेल्या हल्ल्याचा आम आदमी पार्टी घुग्घुस द्वारा निषेध

27

✒️पंकज रामटेके(विशेष प्रतिनिधी)

मोदी सरकारला केजरीवाल ची भीती,३० मार्च २०२२ रोजी दिल्लीचे मुख्यमंत्री तथा आम आदमी पार्टीचे संस्थापक अध्यक्ष अरविंद जी केजरीवाल यांच्या राहत्या घरी भाजपा युवा मोर्चा दिल्लीच्या नेत्यांनी तोडफोड केली ब्यारिगेत तोडले, सीसीटीव्ही कॅमेरा फोडले, कलर फेकला अश्या प्रकारचे क्रूर कृत्य गुन्हेगारी प्रवृत्तीच्या भाजपाच्या सांसद तेजस्वी व कार्यकर्त्यांनी केली.हा हल्ला निंदनीय आहे यावरून असे दिसून येते की मा. अरविंद केजरीवाल साहेबांच्या जीवाला धोका आहे. आम आदमी पार्टीची वाढती लोकप्रियता बघता येत्या निवडणुकीमध्ये २०२४ ला अरविंद केजरीवाल देशाचे पंतप्रधान बनण्याची दाट शक्यता बघता बीजेपी द्वारा अशी कूटनीती केली जात आहे.याचा तीव्र निषेध करत आम आदमी पार्टी शहर अध्यक्ष अमित बोरकर यांच्या नेतृत्वात ३१ मार्च रोजी घुग्घुस पोलिस स्टेशन मध्ये निवेदन देऊन तक्रार नोंदविण्यात आली.

यावेळी आम आदमी पार्टी शहर अध्यक्ष अमित बोरकर, उपाध्यक्ष अभिषेक सपडी, महिला शहर अध्यक्ष उमा तोकलवार,महिला उपाध्यक्ष सोनम शेख,महिला सचिव विपश्यना धनविजय, महिला कोषाध्यक्ष अंजली नगराळे,महिला संघटनमंत्री पुनम वर्मा, विजया उपलेट्टी, नसीम शेख, धममदिणा नायडू, नहीमा शेख,सह संघटनमंत्री आशिष पाझारे, विकास खाडे, संदीप पथाडे, प्रफुल पाझारे, अनुप धनविजय, निखिल कामतवार, कुलदीप पाटील, रवी शंतलावर, अभिषेक तलापेली, अनुप नळे, स्वप्नील आवळे, सागर बिऱ्हाडे इत्यादी कार्यकर्ते उपस्थित होते.