पूर्ण वेळ शाळा भरवण्याचा निर्णय मागे घेऊन सकाळ पाळीत शाळा घ्याव्यात : शिक्षक भारतीची मागणी

30

✒️सुयोग सुरेश डांगे(विशेष प्रतिनिधी)

चिमुर(दि.30मार्च):-राज्यातील पहिली ते नववी व अकरावीच्या शाळा पूर्ण क्षमतेने सुरू करण्यास तसेच शाळांची वेळ व कार्य काळाबाबत वाढते उष्ण तापमान प्रचंड उकाडा व शाळेतील असुविधा लक्षात घेऊन पुनर्विचार करण्यात यावा अशी मागणी शिक्षक भारतीचे संस्थापक आमदार कपिल पाटील शिक्षक भारतीचे राज्य अध्यक्ष नवनाथ गेंड यांच्यावतीने शालेय शिक्षण मंत्री तसेच शिक्षण आयुक्त यांना निवेदनातून करण्यात आली आहे.

कोरोना संक्रमण काळात विद्यार्थ्यांसाठी शाळा अनेक दिवस बंद होत्या.मध्ये सुरु होऊन पुन्हा बंद करण्याची वेळ आली.परिणामी प्रत्यक्ष अध्ययन अध्यापन प्रभावित झाल्याने विद्यार्थ्यांचे प्रचंड नुकसान झाले. हे प्राथमिक शिक्षक म्हणून मान्य आहे.परंतु शिक्षकांनी कोरोना प्रतिबंधात्मक कर्तव्य पार पाडत असताना कोरोनाच्या काळातही विद्यार्थ्यांच्या शिक्षणाकडे संवेदनशीलतेने व जबाबदारीने लक्ष दिले.वाढते प्रचंड उष्णता तापमान, वर्गखोलीत आवश्यक प्रमाणात पंखे नसणे,ग्रामीण भागातील पाण्याची वणवण अशा विविध कारणांमुळे शाळा मार्च ते एप्रिल अखेर पर्यंत सकाळ सत्रात घेतले जातात.परंतू २४ मार्च २०२२ च्या परिपत्रकानुसार शाळा पूर्णवेळ सुरू ठेवण्यात यावे असे पत्रक निघाले आहे.

विदर्भातील उन्हाची तीव्रता लक्षात घेता दिवसभर पूर्णवेळ शाळा सुरू ठेवणे विद्यार्थ्यांचे आरोग्याच्या दृष्टीने योग्य ठरणार नाही.विद्यार्थ्यांचा अभ्यास पूर्ण होण्यासाठी शिक्षक कटिबद्ध आहेत. स्थानिक परिस्थिती लक्षात घेऊन शाळा सकाळच्या सत्रात सुरू असाव्यात.असे उपरोक्त सर्व मुद्द्यांचा विचार करून दिनांक २४ मार्च २०२२ चा शासन निर्णय मागे घेऊन दिनांक २ मे २०२२ पासून शाळांना सुट्टी जाहीर करावी अशी मागणी शिक्षक भारतीचे नागपूर विभागीय अध्यक्ष प्रकाश ब्राम्हणकर,विभागीय सरचिटणीस सुरेश डांगे,सल्लागार रावण शेरकुरे,चंद्रपूर जिल्हा कार्याध्यक्ष जब्बार शेख,नंदकिशोर शेरकी,विलास फलके,कैलास बोरकर आदींनी केली आहे.