लोडशेडिंग बंद न केल्यास अंदोलन करु

99

🔸गेवराई राष्ट्रवादी काँग्रेसचा ईशारा

✒️नवनाथ आडे(जिल्हा प्रतिनिधी बीड)मो:-9075913114

गेवराई(दि.१एप्रिल):-गेवराई शहरासह ग्रामीण भागामध्ये महावितरण कडून मोठ्या प्रमाणावर लोडशेडिंग सुरु असून लोडशेडिंग बंद न केल्यास गेवराई राष्ट्रवादी काँग्रेसकडून तिव्र स्वरूपाचे आंदोलन करण्याचा इशारा महावितरण अभियंता यांना दिलेल्या निवेदनात
देण्यात आला आहे.

गेवराई शहरासह ग्रामीण भागामध्ये महावितरण कडून मोठ्या प्रमाणावर लोडशेडिंग सुरु आहे. सध्या कडक उन्हाळा सुरु असून विद्यार्थ्यांच्या परिक्षाही सुरू आहेत तसेच मुस्लिम समाजाचा पवित्र रमजान महिना सुरु होत आहे. अशा कठीण परिस्थितीमध्ये महावितरण कडून नागरिकांना, विद्यार्थ्यांना आणि शेतकऱ्यांना वेठीस धरण्याचे काम सुरु आहे. गेवराई राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने गेवराई महावितरणचे उप अभियंता विजय कपुरे यांना लोडशेडिंग बंद करण्या बाबतचे निवेदन देऊन लोडशेडिंग बंद न केल्यास राष्ट्रवादी कडून तिव्र स्वरूपाचे आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला.

यावेळी राष्ट्रवादीचे उपाध्यक्ष दत्ता दाभाडे, वसीम फारोकी, विद्यार्थी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष अक्षय पवार, शहराध्यक्ष मोहसिन शेख, अल्पसंख्यांक सेलचे शहराध्यक्ष नविद मशायक, वैभव दाभाडे, मौलाना आझाद संघटनेचे तालुकाध्यक्ष मुख्तार ईनामदार, वसीम बागवान, अफरोज ईनामदार, सय्यद अदनान यांच्यासह राष्ट्रवादीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.