धरणगाव तालुका पत्रकार संघतर्फे आबासाहेब राजेंद्र वाघ यांचा सत्कार

38

🔸आरटीआय जिल्हाध्यक्षपदी वाघ यांची नियुक्ती

✒️धरणगाव प्रतिनिधी(पी.डी.पाटील सर)

धरणगाव(दि.१एप्रिल):-शुक्रवार रोजी शासकीय विश्रामगृह कार्यालयात फुले – शाहू आंबेडकरी विचारांचे सत्यशोधकीय, त्याचप्रमाणे धरणगाव तालुका पत्रकार संघाचे सदस्य राजेंद्र जगन्नाथ वाघ यांची स्वराज्य बहुउद्देशीय संस्थेच्या माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघाच्या जळगाव जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती झाल्याबद्दल सत्कार करण्यात आला. याप्रसंगी ऍड. व्ही.एस. भोलाणे यांच्या हस्ते राजेंद्र वाघ यांना शाल- पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.

सत्कार प्रसंगी पत्रकार संघाचे तालुकाध्यक्ष ॲड.व्ही.एस भोलाणे, ज्येष्ठ सदस्य विजय शुक्ला, शैलेश भाटिया, धर्मराज मोरे, भगीरथ माळी, राजेंद्र रडे, आर.डी.महाजन, पी.डी.पाटील, प्रभुदास जाधव, जितेंद्र महाजन, ॲड. आशिष बाचपाई, विनोद रोकडे, निलेश पवार, स्वप्निल भाटिया, योगेश पी.पाटील, लक्ष्मण पाटील, कमलाकर पाटील, सतीश शिंदे, भरत शिरसाट, राजू बाविस्कर, ॲड. हर्षल चौहान, महेंद्र तायडे यासह आदी पत्रकार बांधवांनी अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.