पवित्र रमजान महिन्यात कायम विद्युत पुरवठा करा – आ.डॉ. रत्नाकर गुट्टे

26

✒️अनिल साळवे(गंगाखेड प्रतिनिधी)

गंगाखेड(दि.3एप्रिल):-2022 रविवार पासून पवित्र रमजान महिन्यात प्रारंभ होत आहे. गंगाखेड मतदार संघासह संपूर्ण परभणी जिल्ह्यातील मुस्लिम बांधवांना पवित्र रमजान महिन्यातील सर्व उत्सव व दैनंदिन प्रार्थना निर्विघ्नपणे पार पाडण्याकरिता त्यांना संपूर्ण महिनाभर भारनियमन न घेता सुरळीत व कायम विद्युत विद्युत पुरवठा करणे गरजेचे आहे असे आमदार गुट्टे यांनी मा. अधीक्षक अभियंता, म.रा.वि.वि.कं. मर्या. परभणी यांना दिलेल्या पत्रात म्हटले आहे.

सध्या शहरासह ग्रामीण भागामध्ये मोठ्या प्रमाणात भारनियमन सुरू असल्याने सर्वसामान्य नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. जगाचा पोशिंदा बळीराजा या भारनियमनाला अत्यंत वैतागला असून त्याच्या वार्षिक उत्पन्नावर ही याचा विपरीत परिणाम होत आहे.पवित्र रमजान महिन्यात गंगाखेड मतदारसंघासह संपूर्ण परभणी जिल्ह्यात भारनियमन न घेता सुरळीत व खंडित विद्युत पुरवठा करण्याची मागणी आमदार डॉ. रत्नाकर गुट्टे यांनी केली आहे.